Wrestlers Protest sakal
क्रीडा

Wrestlers Protest : कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ खाप पंचायत; आंदोलनाची दिशा ठरणार

मुजफ्फरनगरात आज आयोजन; पंतप्रधानांनी माैन बाळगल्याबद्दल नाराजी

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : पदके विसर्जित करण्याचा निर्णय मागे घेतल्यानंतर आता कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ मुजफ्फरनगरात खाप पंचायत होणार असून येथेच पुढील आंदोलनाची दिशा ठरणार आहे. दरम्यान, विजेंदर सिंग यांनी या प्रकरणावर पंतप्रधानांनी माैन बाळगल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

गेल्या सव्वा महिन्यापासून जंतरमंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाचे केंद्रबिंदू आता हरयाणा व उत्तरप्रदेशात गेले आहे. पोलिस कोणतीही कारवाई करीत नसल्याच्या निषेधार्थ कुस्तीपटूंनी पदके गंगेत विसर्जित करण्याचा निर्णय घेतला होता.

मात्र शेतकरी नेते नरेश टिकैत यांच्या हस्तक्षेपानंतर कुस्तीपटूंनी हा निर्णय मागे घेतला. त्यांच्या समर्थनार्थ खाप पंचायत पुढे आल्या आहेत. या खाप पंचायत उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरात गुरुवारी होणार आहे. यावेळी आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे.

पंतप्रधानांची चुप्पी निराशाजनक : विजेंदर सिंग

भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात लैंगिक शोषणाची तक्रार केल्यानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बाळगलेले मौन निराशाजनक असल्याची प्रतिक्रिया मुष्टीयोद्धा विजेंदर सिंग यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

खासदार दीपेंद्र हुडा यांच्यासोबत पत्रकारांशी बोलताना विजेंदर सिंग म्हणाले, महिला कुस्तीपटू न्याय मागण्यासाठी आंदोलन करीत आहे. या आंदोलनाची दखल केंद्र सरकारने घ्यायला पाहिजे होती. परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात आले. पोलिस बळाचा वापर करून कुस्तीपटूंचे आंदोलन चिरडण्यात आले. या प्रकारानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अद्यापही कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. हा सर्व प्रकार फारच वेदनादायी व निराशाजनक असल्याचे विजेंदर सिंग यांनी सांगितले.

पोलिसांवर विश्वास ठेवा: ठाकूर

पोलिस करीत असलेल्या चौकशीवर कुस्तीपटूंनी विश्वास ठेवावा, असे आवाहन केंद्रीय मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी केले. कुस्तीपटूंनी पदके गंगेत विसर्जित करण्याचा निर्णय घेऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.

महिला कुस्तीपटूंची फरफट थांबवा ः राज ठाकरे

‘आंदोलन करणाऱ्या महिला कुस्तीपटूंचे म्हणणे ऐकून घ्यावे आणि त्यावर सन्मानजनक तोडगा काढावा,’ अशी विनंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. २८ मे रोजी कुस्तीपटूंची जी फरफट झाली ती पुन्हा होऊ नये यासाठी आपण स्वतः यामध्ये लक्ष घालावे असेही त्यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘‘ आपण स्वतः या विषयांत लक्ष घालून त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे आणि सन्मानजनक तोडगा काढावा आणि भारतीय क्रीडाजगताला आश्वस्त करावे, ही नम्र विनंती.’’

त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करा ः मालिवाल

ब्रिजभूषण यांच्याविरोधात तक्रार करणाऱ्या अल्पवयीन पीडितेची ओळख जाहीर करणाऱ्या व्यक्तीवर तातडीने गुन्हा दाखल करा, अशी मागणी दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालिवाल यांनी पोलिसांकडे केली आहे. पीडितेचा चुलता असल्याचा दावा करणाऱ्या संबंधित व्यक्तीने तिच्या तक्रारीची कागदपत्रे माध्यमांना दाखविल्यामुळे तिची ओळख उघड झाली होती, असे मालिवाल यांनी म्हटले आहे

‘पुरावे नसल्याचे माध्यमांतील वृत्त चुकीचे’

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरणसिंह यांच्यावरील लैंगिक शोषणाच्या आरोपांची चौकशी सुरू असून त्यांच्याविरोधात सबळ पुरावेच नाहीत, अशा माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्या चुकीच्या असल्याचे मत दिल्ली पोलिसांनी मांडले आहे.

अनेक वृत्तवाहिन्या या ब्रिजभूषण यांच्याविरोधात आमच्याकडे सबळ पुरावे नसल्याच्या बातम्या दाखवीत आहेत पण तो दावा चुकीचा असून अद्याप अंतिम चौकशी अहवाल संबंधित न्यायालयासमोर सादर करणे बाकी आहे.

असे दिल्ली पोलिसांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून प्रकाशित केलेल्या निवेदनामध्ये म्हटले होते. या संवेदनशील प्रकरणाची तितक्याच संवेदनशीलपणे चौकशी सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

दरम्यान ब्रिजभूषण यांच्याविरोधातील महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनामुळे राजकारण तापले असताना आता स्वतः ब्रिजभूषण यांनीच पुन्हा त्यांच्यावरील आरोपांचे खंडन केले आहे. माझ्याविरोधातील एकजरी आरोप सिद्ध झाला तरीसुद्धा मी स्वतः फाशी घेईन असे त्यांनी म्हटले आहे. आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंकडे काही पुरावे असतील तर त्यांनी ते न्यायालयासमोर सादर करावेत. मी शिक्षेला सामोरे जायला तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jyotiba Chaitra Yatra 2026 : कामदा एकादशीच्या मुहूर्तावर चैत्र यात्रा सुरू; गुलाल-खोबऱ्याची उधळण, सीमाभागासह राज्यभरातील भाविक दाखल

UP industry Policy: UP मध्ये आता लायसन्स राज संपणार! छोट्या उद्योगांना योगी सरकारची मोठी भेट; 'या' सुविधेमुळे ५ वर्षे तपासणीतून मुक्ती

IPL 2026 CSK vs RR : MS Dhoni च्या जागी कुणाला मिळणार Playing XI मध्ये संधी? 'या' २० वर्षीय खेळाडूचं नाव चर्चेत...

Dattatray Bharane : 'भोंदूबाबा-महाराज हे सगळं झूट, पोरांनो त्यांच्या नादाला अजिबात लागू नका'; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा सल्ला

Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! सोनं-चांदी आणखी स्वस्त; पाहा आजचे ताजे भाव

SCROLL FOR NEXT