Kieron Pollard Became First Player Played 600 T20 Matches In The World esakal
क्रीडा

Kieron Pollard : पोलार्डचे मोठे रेकॉर्ड; 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू

अनिरुद्ध संकपाळ

Kieron Pollard : वेस्ट इंडीजचा माजी कर्णधार कायरॉन पोलार्डने टी 20 क्रिकेटमध्ये एक मोठे रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहे. विंडीजचा धडाकेबाज फलंदाज पोलार्ड द हंड्रेड स्पर्धेत लंडन स्पिरीट कडून खेळतोय. या स्पर्धेत मँचेस्टर ओरिजनल्सविरूद्धचा सामना हा पोलार्डचा 600 वा टी 20 सामना ठरला. पोलार्डने आपला 600 व्या टी 20 सामन्यात 11 चेंडूत 34 धावा चोपल्या. त्यात त्याने एक चौकार आणि चार षटकार ठोकले.

पोलार्डची टी 20 मधील आकडेवारी जबरदस्त आहे. त्याने 600 सामन्यात 11,723 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 31.34 इतकी आहे. त्याची 104 धावा ही टी 20 मधील सर्वोत्त कामगिरी आहे. पोलार्डने टी 20 मध्ये एक शतक आणि 56 अर्धशतके ठोकली आहे. याचबरोबर त्याने 309 विकेट देखील घेतल्या आहेत. 15 धावात 4 विकेट ही त्याची बेस्ट बॉलिंग फिगर आहे.

कायरॉन पोलार्डने टी 20 क्रिकेट प्रकारात अनेक संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. यात वेस्ट इंडीज, त्रिनिदाद आणि टोबॅगो, मुंबई इंडियन्स, अॅडलेड स्ट्रायकर्स, मेलबर्न रेनेगॅड्स, ढाका ग्लॅडियेटर्स आणि ढाका डायनामिक्स, कराची किंग्ज, मुल्तान सुल्तान, पेशावर झालमी ट्रिनबॅगो नाईट रायडर्स या संघाचा समावेश आहे. कायरॉन पोलार्डनंतर सर्वाधिक टी 20 सामने खेळणाऱ्यांच्या यादीत ड्वेन ब्राव्हो (543 सामने), शोएब मलिक (472 सामने), ख्रिस गेल (463 सामने), रवी बोपारा (426 सामने) यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India : सूर्यकुमार यादवसाठी दरवाजे अजूनही खुले... माजी कर्णधाराचे टीम इंडियात पुनरागमन शक्य... जाणून घ्या, कसं!

RBI News: WhatsApp वर RBI चा मेसेज आला? खिशातील रुपया आता मोबाईलमध्ये! डिजिटल रुपया म्हणजे काय आणि तो कसा वापरायचा जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय पेरांबूरला भेट देत आहेत

IND vs ENG: 'Lords' वर देव! भारतीय महिला खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी पोहोचला सचिन तेंडुलकर Video

Devkund News: देवकुंड डोहात बुडालेल्या दोन्ही तरुणांचे मृतदेह 50 फूट खोल डोहात सापडले; अवघ्या पंधरा मिनिटात रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी

SCROLL FOR NEXT