KL Rahul 
क्रीडा

Asia Cup 2022 : उपकर्णधार केएल राहुलवर आशिया कप 2022 पूर्वी टांगती तलवार

आशिया चषक 2022 च्या प्लेइंग इलेव्हनमधून केएल राहुलचा पत्ता कापल्या जाणार नाहीत का? कारण अनेक खेळाडू फॉर्मात आहेत.

Kiran Mahanavar

KL Rahul Asia Cup 2022 : आशिया चषक 2022 साठी केएल राहुलला भारतीय संघात स्थान मिळाल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटले आहे. आणखी आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याला उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे, ज्याने आयपीएल 2022 पासून एकही सामना खेळला नाही. अशा परिस्थितीत बीसीसीआयने फिटनेस चाचणी उत्तीर्ण करत त्याला झिम्बाब्वे दौऱ्यावर पाठवले आणि कर्णधारपदी नियुक्त केले. मात्र फलंदाज म्हणून त्याला चांगली कामगिरी करता आली नाही.

पहिल्या सामन्यात केएल राहुल सलामीला आला नव्हता, पण दुसऱ्या सामन्यात सलामीला आला तेव्हा त्याला पाच चेंडूत 1 धाव करता आली. अशा स्थितीत आशिया चषक 2022 पूर्वी त्याला खेळासाठी वेळ मिळण्याची शेवटची संधी होती. आशिया चषक 2022 च्या प्लेइंग इलेव्हनमधून त्याचा पत्ता कापल्या जाणार नाहीत का? कारण अनेक खेळाडू फॉर्मात आहेत. आशिया चषक स्पर्धेत भारताचा पहिला सामना 28 ऑगस्ट रोजी पाकिस्तानविरुद्ध आहे आणि भारतीय व्यवस्थापन चांगल्या फॉर्ममध्ये नसलेल्या प्लेइंग इलेव्हनमधील खेळाडूची शक्यता टाळेल. हा निर्णय व्यवस्थापनाला घ्यायचा असला तरी एक गोष्ट मात्र नक्की की प्लेइंग इलेव्हनची सर्व समीकरणे बिघडणार आहेत, कारण बहुतांश खेळाडू सध्या फॉर्मात आहेत आणि संघाचा भाग आहेत.

केएल राहुलला सलामीसाठी पाठवले तर विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर खेळेल आणि सूर्यकुमार यादवला चौथ्या क्रमांकावर जावे लागेल. ऋषभ पंत पाचव्या क्रमांकावर असेल, तर हार्दिक पांड्याला सहाव्या क्रमांकावर संधी मिळेल. या स्थितीत दिनेश कार्तिकची प्लेइंग इलेव्हनमध्ये निवड करायची की दीपक हुडाला संधी द्यायची, असा प्रश्न उपस्थित होणार आहे. ही परिस्थिती टाळण्यासाठी प्लेइंग इलेव्हनमधून केएल राहुलचे कार्ड कापले जाऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: जय शाह - शाहिद आफ्रिदीने खरंच एकत्र बसून पाहिला IND vs PAK सामना? जाणून घ्या Viral Video मागील सत्य

UPI Cash Withdrawal: आता कॅशसाठी एटीएममध्ये जाण्याची गरज पडणार नाही, स्कॅन करताच रोख रक्कम हातात येईल, पण कसं?

Latest Marathi News Updates : पंजाबच्या पुरग्रस्तांना वणीकरांचा मदतीचा हात

IND vs PAK, Asia Cup: भारतानं हस्तांदोलन टाळलं, पण पाकिस्तानची कारवाई आपल्याच अधिकाऱ्यावर; पदावरूनच केलं बडतर्फ

Saurabh Bharadwaj Challenge SuryaKumar Yadav : ‘आप’चे नेते सौरभ भारद्वाज यांचं सूर्यकुमार यादवला चॅलेंज अन् टोमणेही मारले!

SCROLL FOR NEXT