India vs England 3rd Test KL Rahul and Ravindra Jadeja News Marathi sakal
क्रीडा

Ind Vs Eng : टीम इंडियात परतले KL राहुल अन् जडेजा; परंतु BCCI ने घातली मोठी अट, खेळायच पण...

KL Rahul and Ravindra Jadeja News : बीसीसीआयने इंग्लंड विरुद्धच्या उर्वरित तीन सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे....

Kiran Mahanavar

India vs England Test Series : बीसीसीआयने इंग्लंड विरुद्धच्या उर्वरित तीन सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडलेले केएल राहुल आणि रवींद्र जडेजा पुन्हा एकदा भारतीय संघात परतले आहेत. मात्र, तो तिसरा कसोटी सामना खेळणार की नाही, यावर अजूनही प्रश्न किंवा चिन्ह आहेत.

हैदराबाद कसोटीनंतर दोन्ही खेळाडू दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडले होते. जडेजाला हॅमस्ट्रिंगच्या समस्येचा सामना करावा लागला तर केएल राहुलनेही पहिल्या टेस्टनंतर दुखापतीची समस्या सांगितले होती. आता हे दोन्ही खेळाडू पुन्हा एकदा भारतीय संघात परतले आहेत, मात्र 15 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या कसोटी सामन्यात ते खेळतील की नाही याबाबत अजूनही शंका आहे.

रवींद्र जडेजा आणि केएल राहुल यांचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे, परंतु बीसीसीआयने संघाच्या घोषणेमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की, रवींद्र जडेजा आणि केएल राहुलचे भारतीय संघात पुनरागमन तेव्हाच शक्य आहे जेव्हा त्यांना वैद्यकीय संघाकडून फिटनेस मंजुरी मिळेल.

अशा स्थितीत आता भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी दोन्ही खेळाडूंना फिटनेस सिद्ध करावा लागणार आहे. त्यानंतरच 15 फेब्रुवारीपासून इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात ते पुन्हा एकदा पुनरागमन करू शकतील.

भारतीय संघाच्या या दोन्ही खेळाडूंनी हैदराबाद कसोटीत चांगली कामगिरी केली होती. या दोघांनी पहिल्या डावात अर्धशतके झळकावली होती. पण सामन्यानंतर दोन्ही खेळाडूंना दुखापत झाली. त्यामुळे ते विशाखापट्टणम कसोटी सामना खेळू शकला नाही.

त्यानंतर असे वृत्त आले होते की, हे दोन्ही खेळाडू इंग्लंडविरुद्धच्या संपूर्ण कसोटी मालिकेतून बाहेर जाऊ शकतात. मात्र या दोघांचे पुनरागमन झाले आहेत. पण त्याआधी केएल राहुल आणि जडेजा यांना त्यांची फिटनेस सिद्ध करावी लागेल, त्यानंतरच त्यांना प्लेइंग 11 मध्ये खेळण्याची संधी मिळेल.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना 15 फेब्रुवारीपासून गुजरातमधील राजकोट येथे खेळला जाणार आहे. या मालिकेत दोन्ही संघांनी 1-1 सामने जिंकले आहेत. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या दोन कसोटी सामन्यांपैकी पहिली कसोटी हैदराबाद येथे खेळली गेली, ज्यात यजमान इंग्लंडने 28 धावांनी विजय मिळवला. त्यानंतर दुसरा कसोटी सामना विशाखापट्टणम येथे खेळला गेला. ज्यामध्ये भारताने इंग्लंडचा 106 धावांनी पराभव करत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT