KL Rahul-Athiya Shetty Marriage Date 
क्रीडा

KL Rahul-Athiya Shetty : 'या' दिवशी बोहल्यावर चढणार राहुल; BCCI नेच केला खुलासा

KL राहुल करणार अथिया शेट्टीशी लग्न....

सकाळ ऑनलाईन टीम

KL Rahul-Athiya Shetty Marriage Date : स्टार फलंदाज केएल राहुलला टी-20 वर्ल्ड कप-2022 नंतर न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेतून त्याला विश्रांती देण्यात आली होती. आता त्यांच्या लग्नाच्या अनेक बातम्या येत आहेत. एका मीडिया रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की लग्नामुळे केएल राहुल पुढील वर्षी श्रीलंकेविरुद्धच्या देशांतर्गत क्रिकेट मालिकेचा भाग असणार नाही.

टीम इंडियाचा उपकर्णधार केएल राहुल घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेत खेळू शकणार नाही. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर राहुलने बीसीसीआयकडे 'मिनी ब्रेक' मागितल्याचे एका वृत्तात म्हटले आहे. InsideSport च्या रिपोर्टनुसार, KL राहुल जानेवारी-2023 च्या पहिल्या आठवड्यात अथिया शेट्टीशी लग्न करणार आहे. अथिया ही बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी आहे.

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यानेही राहुलने ब्रेक मागितल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अधिकाऱ्याने सांगितले, केएलने काही वैयक्तिक कामासाठी वेळ मागितला आहे. त्यामुळेच तो न्यूझीलंडमध्ये खेळला नाही. दुखापतीची चिंता नाही. त्याच्या काही कौटुंबिक बांधिलकी आहेत. त्याने आम्हाला बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर ब्रेक मागितला आहे.

बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर पुन्हा एकदा नियमित कर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्मालाही टी-20 मालिकेतून विश्रांती मिळण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत हार्दिक पांड्या टी-20 मालिकेत टीम इंडियाचे कर्णधारपद सांभाळणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. ही मालिका जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OYO Hotels: ओयो हॉटेलमध्ये एक तासात नेमकं काय होतं? सरकार अभ्यास करणार? सुधीर मुनगंटीवरांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला

Latest Maharashtra News Updates : इगतपुरी तालुक्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अजूनही पावसाचा जोर कायम

ENG vs IND: इंग्लंडच्या रस्त्यावर आकाश दीपचा दरारा! इंग्रज गात आहेत नवा नारा; Video व्हायरल

Stock Market Closing: सेन्सेक्स 9 अंकांच्या वाढीसह बंद; FMCG आणि रिअल्टी शेअर्स वधारले, 'हे' शेअर्स बनले टॉप गेनर्स

Xi Jinping: जिनपिंग यांच्या अधिकारात बदल शक्य; विकेंद्रीकरणाचे माध्यमांत वृत्त; नेतृत्वाच्या बदलाचीही रंगली चर्चा

SCROLL FOR NEXT