esakal
क्रीडा

दीपक चाहर नव्हे, तर 'या' परदेशी क्रिकेटरच्या लग्नाला पोहचला के एल राहुल

क्रिकेट जगतात चाहरच्या लग्नासोबत डेविड मथियासच्या लग्नाची देखील रंगली चर्चा

धनश्री ओतारी

भारतीय टीमचा २९ वर्षीय स्टार ऑलराउंडर दीपक चाहर काल गर्लफ्रेंड भारद्वाज सोबत लग्नबंधनात अडकला. दीपक चाहरच्या लग्नाला अनेकांनी उपस्थिती दर्शवली. अनेक क्रिकेटर्सही त्याच्या लग्नाचे साक्षीदार ठरले. पण एकमेव असा खेळाडू जो चाहरच्या लग्नाला न जाते थेट बहरीन येथील क्रिकेट डेविड मथियासच्या लग्नाला पोहचला. सध्या क्रिकेट जगतात चाहरच्या लग्नासोबत डेविड मथियासच्या लग्नाची देखील चर्चा रंगली आहे.

टीम इंडियाचा धडाकेबाज खेळाडू के एल राहुलने बहरीनमध्ये त्याचा मित्र डेव्हिड कीलन मॅथियासच्या लग्नाला तो उपस्थिती लावली. याचे अनेक फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये राहुल कुर्ता पायजमा घातलेला दिसत आहे. त्याचबरोबर राहुलने लग्नाचे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये 'भाई की शादी' असं म्हटलं आहे.

डेव्हिड मॅथियासने त्याची मैत्रीण कल्याणी देसाई हिच्याशी लग्न केले. डेव्हिडचा जन्म भारतात झाला आणि तो कर्नाटककडून क्रिकेट खेळला. तेव्हा केएल राहुल त्याच्यासोबत होता, त्यामुळेच दोघांमध्ये खूप घट्ट मैत्री आहे. केएल राहुलच्या फोटोवर अथिया शेट्टीनेही कमेंट केली आहे.

बहरीनकडून क्रिकेट खेळला

डेव्हिड मॅथियासने 2022 साली बहरीनकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने चार सामन्यांत 119 धावा केल्या. त्याच वेळी, या 31 वर्षीय फलंदाजाने 2015-16 मध्ये रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केले, परंतु भारतात त्याची कारकीर्द फार काळ टिकली नाही. या कारणास्तव तो बहारीनकडे वळला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Corruption News : पैसा डबल करण्याच्या आमिषाला पोलिसही बळी; एसपींच्या आदेशानंतर अधिकाऱ्यांची नावे समोर, घटनेने खळबळ

Manikrao Kokate: १९९६ चा खटला… दिवंगत बापासाठी मुलगी लढली अन् न्याय मिळून दिला, माणिकराव कोकाटेंविरोधात लढलेल्या ॲड. अंजली दिघोळे...

VIDEO : 'गावातील अंबानी शेतकऱ्याचं घर'! 20 एकरातील आलिशान घर पाहून नेटकरीही थक्क; गाड्यांपासून घोड्यांपर्यंत सर्व काही इथे आहे...

Viral Video: किती गोड! आजोबांनी रेल्वेत आजीसाठी केलं असं काही... व्हायरल व्हिडिओ पाहून आनंदाश्रू उभे राहतील

'त्याने माझे खराब व्हिडिओ पोस्ट केले होते' सोशल मीडियाचा अनुभव सांगताना प्राजक्ता माळी म्हणाली...

SCROLL FOR NEXT