KL Rahul  esakal
क्रीडा

KL Rahul : 10 पैकी 10! कर्णधार राहुलने इतिहास रचला; आफ्रिकेत अशी कामगिरी करणारा ठरला पहिला कर्णधार

अनिरुद्ध संकपाळ

KL Rahul : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात केएल राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारताने यजमानांचा 8 विकेट्सनी पराभव केला. प्रथम गोलंदाजी करणाऱ्या भारताने दमदार कामगिरी करत आफ्रिकेचा संपूर्ण संघ 116 धावात गारद केला होता. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने 5 तर आवेश खानने 4 विकेट्स घेतल्या. त्यानंतर साई सुदर्शनच्या नाबाद 55 आणि श्रेयस अय्यरच्या 52 धावांच्या जोरावर 117 धावांचे आव्हान 17 षटकातच पार केलं.

कर्णधार केएल राहुलच्या नेतृत्वाखालील संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1 - 0 अशी आघाडी घेतली आहे. कर्णधार म्हणून केएल राहुलने देखील आजच्या सामन्यात काही माईल स्टोन पार केले. त्याचा कर्णधार म्हणून गेल्या 10 आंतरराष्ट्रीय सामन्यातील हा सलग 10 वा विजय आहे. त्यामुळे केएलला कॅप्टन्सीबाबत आपण 10 पैकी 10 गुण देऊ शकतो.

याचबरोबर केएल राहुलने एक अनोखा विक्रम देखील आपल्या नावावर केला आहे. दक्षिण आफ्रिकेत गुलाबी वनडे सामन्यात विजय मिळवून देणारा केएल राहुल हा भारताचा पहिला कर्णधार ठरला आहे. यापूर्वी अशी कामगिरी कोणत्याही भारतीय कर्णधाराला करता आली नव्हती.

आजच्या सामन्याचा हिरो हा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग ठरला. त्याने भारतीय वनडे संघात पुनरागमन केले. पुनरागमनाच्या सामन्यातच त्याने 5 विकेट्स घेत आपली उपयुक्तता सिद्ध केली. सामन्यानंतर अर्शदीपने कर्णधार केएलचे आभार मानले. तो म्हणाला की, 'मी केएल भाईचे आभार मानू इच्छितो. त्याने मला कायम प्रोत्साहित केलं. माझ्या पदार्पणाच्या सामन्यात त्याने मला मोठा स्पेल दिला.'

अर्शदीप पाठोपाठ 22 वर्षाच्या साई सुदर्शन देखील लक्षवेधी ठरला. त्याने पदार्पणाच्या सामन्यातच दक्षिण आफ्रिकेविरूद्ध दक्षिण आफ्रिकेत अर्धशतक ठोकले. त्याने 43 चेंडूत नाबाद 55 धावा केल्या. त्याला साथ देणाऱ्या श्रेयस अय्यरने देखील 52 धावांची अर्धशतकी खेळी केली. अय्यरची ही 54 वनडे सामन्यातील 18 वी फिफ्टी आहे. तर त्याने 5 शतकी खेळी देखील केल्या आहेत. त्याची वनडेमधील सरासरी ही आता 50 च्या वर गेली आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ईडीने जप्त केलेली 3,464 कोटींची मालमत्ता विक्री करण्यास कोर्टाची मंजुरी; गुंतवणूकदारांचे 1,950 कोटी माघारी मिळणार

Akola Crime : कार लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश! ‘एलसीबी’कडून सहा तासांत तीन आरोपी अटकेत, १८.७० लाखांचा मुद्देमाल जप्त

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखान्याच्या विजयी उमेदवारांनी अजितदादांना वाहिली आदरांजली

Cordelia Sky : १,५०० ड्रोनच्या रोषणाईने मुंबईचे आकाश उजळले! ‘कॉर्डेलिया स्काय’चे आगमन

INS Mangrol : मुंबईच्या सागरी सुरक्षेला स्वदेशी ‘आयएनएस मंगरोल’चे बळ!

SCROLL FOR NEXT