KL Rahul ESAKAL
क्रीडा

KL Rahul : धोनीनंतर केएलच! जे ऋषभ पंतला जमलं नाही ते राहुलनं करून दाखवलं

अनिरुद्ध संकपाळ

KL Rahul ODI Cricket Record : भारताचा काळजीवाहू कर्णधार केएल राहुलने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिसऱ्या सामन्यात एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. भारताचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी गेल्यानंतर केएल राहुलने संजू सॅमसन सोबत भागीदारी रचली होती. मात्र तो 21 धावा करून बाद झाला.

जरी केएल राहुल 21 धावा करून बाद झाला असला तरी केएल राहुलने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. 14 वर्षाच वनडेमध्ये एका कॅलेंडर वर्षात 1000 धावा करणारा तो पहिला भारतीय विकेटकिपर फलंदाज झाला आहे.

https://twitter.com/StarSportsIndia/status/1737106374105157968

केएल राहुल हा महेंद्रसिंह धोनीनंतर वनडेमध्ये अशी कामगिरी करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. 2021 मध्ये ऋषभ पंत हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात 1000 पेक्षा जास्त धावा करणारा धोनीनंतरचा पहिला भारतीय विकेटकिपर फलंदाज झाला होता. मात्र वनडेमध्ये धोनीनंतर अशी कामगिरी करणारा केएल राहुल हाच दुसरा फलंदाज आहे.

केएल राहुलने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात 35 चेंडूत 21 धावा केल्या. त्याने संजू सॅमसनसोबत तिसऱ्या विकेटसाठी 52 धावांची महत्वपूर्ण भागीदारी रचली. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांची मालिका 1 - 1 अशी बरोबरीत आहे. आजचा तिसरा आणि निर्णायक सामना जिंकून मालिका खिशात टाकण्यासाठी महत्वाचा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्यांच्या ठसक्याने रंगायचा लावणीचा फड! त्या शकुंतलाताई नगरकर काळाच्या पडद्याआड, कलाविश्वावर शोककळा

Latur Water Crisis : उजनी’ची व्यवहार्यता लालफितीतच; मुख्यमंत्र्यांना लातूरचा दुष्काळ अवगत; पण दहा वर्षांत शाश्वत उपाययोजनाच नाही

Vidarbha Orange Alert : विदर्भाला ‘ऑरेंज अलर्ट’; राज्यात तीन दिवस पावसाची शक्यता पुणे घाटमाथ्याला ‘यलो अलर्ट’

Asian Games 2026: भारताची नारी शक्ती! नेमबाजांनी जिंकलं कांस्य; मनू भाकरला अपयश पण, कबड्डीत महिलांची बाजी

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लातूरमध्ये दाखल

SCROLL FOR NEXT