KL Rahul Six esakal
क्रीडा

KL Rahul Six : आता बॉल कोण शोधणार... कर्णधार होताच राहुलने दाखवले आपले रंग, कपिल देव स्टँडचे छत हादरले

अनिरुद्ध संकपाळ

KL Rahul Six : रोहितच्या अनुपस्थितीत भारतीय संघाची धुरा आपल्या खांद्यावर वाहणाऱ्या केएल राहुलने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या दोन्ही वनडे सामन्यात मोठा धमाका केला. पहिल्या सामन्यात कॅप्टन्स इनिंग खेळत भारताला विजय मिळवून दिला. दुसऱ्या सामन्यात गिल अन् अय्यरने दमदार सुरूवात केल्यानंतर केएल राहुलने आपल्या आक्रमक फलंदाजीने सर्वांची मने जिंकली. विशेष म्हणजे त्याने आपल्या डावाच्या सुरूवातीलाच एक असा षटकार मारला की चेंडू थेट होळकर स्टेडियमच्या बाहेरच गेला.

ऑस्ट्रेलियाने भारताला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केल्यानंतर भारताला ऋतुराज गायकवाडच्या रूपाने 16 धावांवर पहिला धक्का बसला. मात्र त्यानंतर शुभमन गिल आणि श्रेयस अय्यरने दुसऱ्या विकेटसाठी 200 धावांची भागीदारी रचत 30 व्या षटकातच भारताला 200 पार पोहचवले. अय्यरने 105 तर गिलने 104 धावांची शतकी खेळी केली.

यानंतर केएल राहुल आणि इशान किशन यांनी 59 धावांची भागीदारी रचत भारताला 40 व्या षटकातच 300 धावांचा टप्पा पार करून दिला. मात्र 18 चेंडूत 31 धावा करत इशान किशनने राहुलची साथ सोडली.

किशननंतर आलेल्या सूर्यकुमार यादवने टी 20 स्टाईल बॅटिंग करत 44 व्या षटकात सलग चार षटकार ठोकले. त्याने अवघ्या सहा षटकात राहुलसोबत 53 धावांची भागीदारी रचली. अखेर 38 चेडूत 52 धावा करणारा केएल राहुल बाद झाला. दरम्यान, सूर्याने देखील आपले अर्धशतक पार केले होते. त्याने जडेजाच्या साथीने भारताला 400 धावांच्या जवळ पोहचवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : पुण्यातील सिंहगड रोड, वारजेत वाहनांच्या लांबच लांब रांगा, अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक वळवल्याने वाहतूक कोंडी

Kolhapur Rain Weather : कोल्हापुरातील सहा धरणांतून १२ हजार क्युसेक विसर्ग, राधानगरी धरण ७० टक्क्यांवर; पावसाचा जोर वाढणार

अधिवेशनात खंडाजंगी! अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करा: आमदार रोहित पवार आक्रमक; पोलिसांवर कोणाचा दबाव?

Latest Maharashtra News Updates : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, मंदिरासमोर भाविकांना कारने चिरडले

Ashadhi Ekadhashi 2025: यंदा 5 की 6 जुलै कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या शुभ मुहुर्त अन् पूजा करण्याची विधी

SCROLL FOR NEXT