IND vs AUS KL Rahul esakal
क्रीडा

IND vs AUS KL Rahul : ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या विजयानंतरही केएल राहुल आहे निराश; मोहालीतील...

अनिरुद्ध संकपाळ

IND vs AUS KL Rahul : भारताने ऑस्ट्रेलियाविरूद्धचा पहिला वनडे सामना 5 विकेट्स राखून जिंकला. वर्ल्डकपपूर्वीच्या तीन वनडे मालिकेची विजयी सुरूवात कर भारताने आपली तयारी योग्य मार्गावर असल्याचे दाखवून दिले. विशेष म्हणजे भारताचा कर्णधार रोहित शर्मासह अनेक वरिष्ठ खेळाडूंना या मालिकेतील पहिल्या दोन वनडे सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली आहे.

रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत केएल राहुल भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाला मात दिल्यानंतर केएल राहुलने प्रतिक्रिया देताचा टीम इंडियाचे कौतुक केले. त्याने एवढ्या उष्ण वातावरणात देखील खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी केली.

राहुल सामन्यानंतर म्हणाला, 'इथं कोलंबोसारखी उष्णता आहे. मला वाटते की खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. आम्ही गोलंदाजीत चांगली कामगिरी केली. मधली काही षटके आमच्यासाठी कठिण राहिली. आम्ही 50 षटके चांगला खेळ दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. आम्ही आमच्या फिटनेसवर चांगली मेहनत घेत आहोत. ते आज दिसून देखील आलं.'

कर्णधार राहुल आपल्या विकेटकिपिंगबद्दल म्हणाला, 'मी 50 षटके विकेटकिपिंग करून एका कठिण परिस्थितीत मैदानात उतरलो. मधल्या फळीतील फलंदाजाला सुरूवात करणं कठिण असतं. मात्र सूर्यकुमारसोबतची भागीदारी चांगली झाली. आम्ही फटकेबाजीबाबत एकमेकांशी सल्लामसलत करत होतो.'

गोलंदाजीत भारताकडून मोहम्मद शमीने कमाल केली. त्याने पाच विकेट्स घेतल्या. त्यालाच सामनावीराचा पुरस्कार देखील देण्यात आला. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स सामन्यानंतर म्हणाला, 'मी पुनरागमनाने खूष आहे. पहिलाच सामना इथं भारतात होता हे चांगलं होतं. जिंकू शकलो नाही याबद्दल निराश आहे.'

'मला वाटते की आमच्या संघातील काही खेळाडूंनी चांगली फलंदाजी केली अन् काही गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT