kl rahul esakal
क्रीडा

KL Rahul : केएल राहुलकडून काढून घेतली 'ही' जबाबदारी; एका कसोटी मालिकेनंतर लगेचच...

केएल राहुलकडून कसोटी क्रिकेटमधील एक जबाबदारी कमी करण्यात आली आहे

अनिरुद्ध संकपाळ

KL Rahul : केएल राहुलने वनडे वर्ल्डकपमध्ये मधल्या फळीतील फलंदात आणि विकेटकिपर म्हणून उत्तम भुमिका निभावली होती. त्यानंतर कसोटी संघात देखील त्याच्यावर विकेटकिपिंगचा भार सोपवण्यात आला होता. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत केएल राहुलने फलंदाजीपाठोपाठ दमदार विकेटकिपिंग देखील केली होती. त्यामुळे राहुलने तीनही फॉरमॅटमधील विकेटकिपर म्हणून पाहिले जात होते.

मात्र टाईम ऑफ इंडियाला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केएल राहुल हा मायदेशात होणाऱ्या इंग्लंडविरूद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत फक्त फलंदाज म्हणून खेळणार आहे. त्याच्या खांद्यावर विकेटकिपिंगचा भार असणार नाही. इंग्लंडविरूद्धची कसोटी मालिका 25 जानेवारीपासून हैदराबाद येथे सुरू होत आहे.

राहुलच्या भूमिकेवर बीसीसीआयमधील एका विश्वसनीय सूत्राने सांगितले की, 'राहुल आतापासून स्पेशालिस्ट फलंदाज म्हणून खेळेल. परदेशातील कसोटीत तुम्हाला फक्त वेगवान गोलंदाजांविरूद्ध विकेटकिपिंग करावी लागते. भारतात जिथे फिरकीपटू सर्वाधिक षटके टाकतात तेथे विकेटकिपिंग करणे सोपेनाही. फिरकीला अनुकूल घरच्या विकेट्सवर चेंडू उसळू शकतो किंवा वळू शकतो. तुम्हाला 'कीपर' म्हणून सारखी उठ बस करावी लागते. आम्हाला त्या भूमिकेत विशेषज्ञ हवा आहे.'

'दुसरीकडे, राहुल हा फलंदाज म्हणून खूप महत्वाचा आहे. त्याला विकेटकिपिंगचे काम करायला लावून आम्ही थकवू शकत नाही. स्टंपच्या मागे उभे असताना त्याला दुखापत होण्याचा धोकाही असतो, जो आम्हाला परवडणार नाही. या मालिकेत केसी भरत आणि जुरेल आमचे यष्टिरक्षक असतील. गेल्या वर्षी मे महिन्यात राहुलच्या मांडीवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.'

या निर्णयामुळे केएस भरतला भारतीय कसोटी संघात पुनरागमन करण्याची संधी मिळाली आहे. त्याने जून 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ओव्हल येथे झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये भारताकडून शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्यात त्याने पहिल्या डावात 5 आणि दुसऱ्या डावात 23 धावा केल्या होत्या. त्याला कसोटी पुनरागमन करण्याची सुवर्ण संधी मिळाली. केसी भरतने पाच कसोटीत 18.42 च्या सरासरीने 129 धावा केल्या आहेत.


दरम्यान, ध्रुव जुरेलला बॅकअप विकेटकिपर म्हणून संघात स्थान दिले आहे. त्याने आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून चमकदार कामगिरी केली होती. तसेच त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्तर प्रदेशसाठी उत्कृष्ट कामगिरी करत निवडकर्त्यांना प्रभावित केले. त्याने 15 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये, जुरेलने 46.47 च्या सरासरीने 790 धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि पाच अर्धशतकांचाही समावेश आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली! भामा आसखेड धरण निम्म्याहून अधिक फुल्ल; आकडेवारी समोर

Water Level: अडाण जलाशयाच्या पाणीसाठ्यात आठवड्याभरात चार टक्क्यांनी वाढ;४५.७५ टक्के जलसाठा

Latest Maharashtra News Live Updates: पंचवटीमध्ये मुसळधार पावसानंतर गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ.

Tanisha Kotecha : नाशिकच्या तनिषा कोटेचाचे आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत शानदार यश

HPCL Recruitment 2025: हिंदुस्तान पेट्रोलियमकडून 2.80 लाख पगाराची नोकरी! 300 हून अधिक जागा; जाणून घ्या अर्ज कसा करावा

SCROLL FOR NEXT