KL Rahul Rishabh Pant Wicket Keeping  esakal
क्रीडा

KL Rahul : सांगितलं म्हणून... राहुलने विकेटकिपिंग करण्याबाबत केला खुलासा

अनिरुद्ध संकपाळ

KL Rahul Rishabh Pant Wicket Keeping : बागंलादेशने पहिला वनडे सामना 1 विकेटने जिंकून मालिकेत 1 - 0 अशी आघाडी घेतली. भारतासारख्या बलाढ्य संघाला बांगलादेशने पराभूत केल्यानंतर भारतीय संघावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. संघ व्यवस्थापन टी 20 वर्ल्डकपपूर्वीपासूनच अनेक प्रयोग करत आहे. बांगलादेश विरूद्धच्या सामन्यात देखील भारतीय संघ व्यवस्थापनाने एक प्रयोग केला. टी 20 मध्ये सलामीला येणाऱ्या केएल राहुलला पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले. तसेच त्याच्या हातात विकेटकिपिंग ग्लोज घालून विकेटच्या मागे देखील उभे करण्यात आले. राहुलने यापूर्वीदेखील असे केले आहे. मात्र बेंचवर इतके सारे विकेटकिपर असताना आणि ते मधल्या फळीत दमदार योगदान देऊ शकत असताना राहुलवर ही जबाबदारी का सोपवण्यात आली हा एक प्रश्न सध्या चर्चेत आला आहे.

केएल राहुलने पहिल्यासामन्यात 73 धावांची खेळी केली. मात्र मोक्याच्या क्षणी राहुल आणि वॉशिंग्टनने मेहदी हसनचा झेल घेताना गोंधळ केला. राहुलने तो झेल सोडला आणि भारताने सामना गमावला. आता केएल राहुलने अचानक विकेटकिपिंग का केली याबाबत खुरासा केला.

राहुल म्हणाला की, 'आम्ही गेल्या 8 ते 9 महिन्यापासून फारसे वनडे क्रिकेट खेळलेले नाही. मी यापूर्वीदेखील विकेटकिपिंग केली आहे. मी यापूर्वीही चौथ्या आणि 5 व्या क्रमांकावर फलंदाजी केलेली आहे. त्यामुळेच ही भुमिका निभावण्यासाठी संघाने तयार रहायला सांगितले होते.'

दरम्यान, केएल राहुल हा वनडे संघाचा उपकर्णधार आहे. त्यामुळे तो संघ व्यवस्थापनाचा एक भाग आहे. मात्र तरी देखील ऋषभ पंतला विश्रांती देण्यात आली आहे की तो दुखापतीमुळे संघाबाहेर आहे याबाबत स्पष्टपणे सांगता आले नाही. तो म्हणाला की, 'ऋषभ पंतविषयी बोलायचे झाले तर मला याबाबत काही माहिती नाही. मला देखील आजच माहिती झालं की त्याला विश्रांती देण्यात येणार आहे. याचं कारण काय आहे हे फक्त वैद्यकीय टीमच चांगल्या प्रकारे सांगू शकेल.'

हेही वाचा : शेतमजूर ते कॅनाॅल मॅन...जाणून घ्या एक यशोगाथा....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT