KL Rahul Wedding Haldi Photo  esakal
क्रीडा

KL Rahul Wedding : केएल राहुलनं लग्नात घातलाय नुसता राडा; नवे फोटो झाले व्हायरल

अनिरुद्ध संकपाळ

KL Rahul Wedding Haldi Photo : भारताचा स्टार फलंदाज केएल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी यांनी नुकतीच लग्नगाठ बांधली. अथिया शेट्टी ही सुपरस्टार सुनिल शेट्टीची लेक आहे. या दोघांचा विवाह सोहळा सुनिल शेट्टीच्या लोणावळा येथील फार्म हाऊसवर झाला. यावेळी दोन्ही कुटुंबातील जवळचे नातेवाईकच उपस्थित होते. दरम्यान, या लग्नाला दोन दिवस उलटून गेले तरी अजून या लग्नाची चर्चा होत आहे. केएल राहुलने नुकतेच त्याच्या हळदीचे फोटो इन्स्टाग्रामवरून शेअर केले आहेत. या फोटोवरून अथिया आणि केएल राहुलने हळदीवेळी खूपच राडा घातल्याचे दिसून येते.

केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांच्या लग्नाला घरच्या मंडळींसह बॉलीवुड मधील काही कलाकारांनीही हजेरी लावली होती. या बॉलीवूड स्टार आणि क्रिकेटपटूंनी केएल राहुलवर कोट्यावधी रूपयांच्या गिफ्टचा वर्षाव केला. ज्यांची एकूण किंमत आपल्या कल्पनेला झेपणारी आहे. अशा महागड्या वस्तु या यादीत आहेत.

केएल राहुल - अथिया शेट्टीला मिळालेले महागडे गिफ्ट्स

सुनिल शेट्टींकडून 50 कोटींचा फ्लॅट

सलमान खानकडून 64 लाखाची ऑडी कार

अर्जून कपूरकडून 1.5 कोटी रूपयांचे ब्रेसलेट

जॅकी श्रॉफकडून 30 लाखांच घड्याळ

विराट कोहलीकडून 2.17 कोटींची BMW कार

महेंद्रसिंह धोनीकडून 80 लाखाची निंजा बाईक

केएल राहुलने लग्नासाठी न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेतून माघार घेतली होती. आता लग्नानंतर तो ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कोसटी मालिकेसाठी भारतीय संघाशी जोडला जाईल. सुनिल शेट्टीने आता आयपीएलनंतरच ग्रँड रिसेप्शन ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले.

(Sports Latest News)

हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT