KL Rahul Will Send To Germany For Treatment Say BCCI Secretary Jay Shah esakal
क्रीडा

केएल राहुल रवाना होणार, इंग्लंडला नाही तर जर्मनीला!

अनिरुद्ध संकपाळ

नवी दिल्ली : भारताचा सलामीवीर केएल राहुल दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरूद्धची टी 20 मालिका मुकला. त्याची दुखापत अजून बरी झाली नसल्यामुळे त्याला इंग्लंड दौऱ्यावर देखील जाता आले नाही. बीसीसीआयने केएल राहुल इंग्लंड दौऱ्यावरील एकमेव कसोटी सामन्याला मुकणार असल्याचे सांगितले. आता बीसीसीआय केएल राहुलला दुखापतीवर उपचार घेण्यासाठी जर्मनीला देखील पाठवणार असल्याचे वृत येत आहे. केएल राहुलचा मांडीचा स्नायू दुखावला आहे. (KL Rahul Will Send To Germany For Treatment Say BCCI Secretary Jay Shah)

बीसीसीआय सचिव जय शहा यांनी क्रिकेबझला प्रतिक्रिया दिली की, 'केएल राहुलच्या फिटनेसवर क्रिकेट बोर्ड काम करत असून लवकरच त्याला जर्मनीला पाठवण्यात येणार आहे.' केएल राहुल इंग्लंड विरूद्धची 2021 ला स्थगित झालेली पाचवी कसोटी खेळण्यासाठी इंग्लंडला रवाना होऊ शकला नाही. याचबरोबर या कसोटी सामन्यानंतर होणाऱ्या तीन वनडे आणि तीन टी 20 सामन्यांना देखील राहुल मुकणार आहे. याच दरम्यान, भारतीय संघ आर्यलंडविरूद्ध दोन टी 20 सामने देखील खेळणार आहे. इंग्लंड दौऱ्यावर केएल राहुलकडे उपकर्णधार पद सोपवण्यात आले होते. मात्र निवडसमितीला आता दुसऱ्या व्यक्तीची कर्णधार म्हणून निवड करावी लागणार आहे.

गुरूवारी पहाटे भारतीय कसोटी संघ मुंबईहून इंग्लंडला रवाना झाला. या संघात राहुलचा समावेश नव्हता. एजबस्टन कसोटीनंतर भारत 7 जुलै ते 17 जुलै दरम्यान टी 20 आणि वनडे मालिका देखील खेळणार आहे. केएल राहुलने आतापर्यंत 43 कसोटी 42 वनडे आणि 56 टी 20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. मात्र फेब्रुवारी महिन्यापासून त्याने एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. तो आयपीएलचा संपूर्ण हंगाम खेळला. तो लखनौ सुपर जायंटचा कर्णधार होता. मात्र त्याचा संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: भारताला विजयाची संधी, पण पाऊस थांबणार कधी? शेवटच्या दिवशी खेळ झाला नाही तर काय, जाणून घ्या

'पुन्हा तोच बसस्टॉप' तेजश्री दिसणार जुन्या स्टॉपवर, फोटो शेअर करत म्हणाली, 'तेच ठाणे, तेच ठिकाण आणि तेच तुम्ही..'

Manmad News : मनमाड बाजार समितीच्या अडचणींवर मुख्यमंत्री फडणवीसांचा ‘सर्जिकल स्ट्राइक

Crime: मुंबईत धक्कादायक प्रकार! आधी गळा दाबून मारलं, नंतर ग्रॅनाइट मशीनने पत्नीचा शिरच्छेद अन्...; विक्षिप्त पतीचं कृत्य

'मला मराठी येत नाही, हिंमत असेल तर हकलून दाखवा' प्रसिद्ध अभिनेत्याचं ठाकरे बंधूंना चॅलेंज, म्हणाला, 'भाषेच्या नावावर हिंसा...'

SCROLL FOR NEXT