Kolhapur Aniket Jadhav selected for the Indian football sakal
क्रीडा

भारतीय फुटबॉल संघामध्ये कोल्हापूरच्या अनिकेत जाधवची निवड

अंतिम २५ जणांची यादी जाहीर, सात नव्या खेळाडूंना संधी

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : बहरिन येथे होणाऱ्या मैत्रीपूर्ण सामन्यांसाठी भारतीय फुटबॉल संघात कोल्हापूरच्या अनिकेत जाधव याचा समावेश झाला आहे. मुख्य प्रशिक्षक इगोर स्टिमॅक  यांनी अंतिम संघाची घोषणा केली. या निवडीने अनिकेत भारतीय वरिष्ठ संघात खेळणारा कोल्हापूरचा पहिला फुटबॉल खेळाडू ठरला आहे. त्याचा या संघात मध्यफळी मजबूत करण्यासाठी समावेश करण्यात आला आहे.  दरम्यान, भारतीय संघ आज रवाना झाला.

ब्लू टायगर्स या नावे भारताचा पहिला सामना ता. २३ ला बहरिन तर ता. २६ ला बेलारूसशी होणार आहे. दोन्ही सामने भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री साडेनऊ वाजता सुरू होणार आहेत. या मैत्रीपूर्ण लढतीसाठी भारतीय संघात सात नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये अनिकेतसह प्रभशुखन गिल, हॉर्मिपम रुईवा, अन्वर अली, रोशन सिंग, व्ही. पी. सुहेर, दानिश फारूक यांचा समावेश आहे. या मैत्रीपूर्ण स्पर्धेमुळे आठ  जूनपासून कोलकाता येथे होणाऱ्‍या ए. एफ. सी. आशियाई चषक चीन २०२३ च्या पात्रता सामन्यांच्या अंतिम फेरीसाठी जोर अजमावता येणार आहे. बहरिन व बेलारूस संघ अधिक प्रबळ आहेत. यामुळे सामने पूर्व तयारीसाठी अधिक मदत कऱणारे आहेत. 

अनिकेतने क्रीडा प्रबोधिनीतून फुटबॉलचा श्रीगणेशा केला. २०१७ मध्ये १७ वर्षांखालील विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धेव्दारे त्याने भारतीय फुटबॉल विश्‍वाचे लक्ष वेधले. त्यानंतर इंडियन एरोज संघातर्फे इंडियन फुटबॉल लीग (आय लीग) प्रथम श्रेणी स्पर्धेत छाप पाडली. जमशेदपूर एफसी तर्फे आयएसएलतर्फे पर्दापण करीत दोन हंगाम खेळला. यंदा आएएसएल विजेत्या हैदराबाद एफसीतर्फे मैदान गाजविले आहे.

या संघाचे पुण्याच्या बालेवाडी येथे सराव शिबिर झाले. यातून अंतिम संघाची घोषणा करण्यात आली. अनिकेत आएसएएल अंतिम सामन्यासाठी गोव्यात असल्याने तो सराव शिबिरात सहभागी झाला नाही. पण, या हंगामातील त्याची उत्कृष्ठ कामगिरी लक्षात घेऊन त्याची अंतिम संघात निवड झाली आहे. यापूर्वी तेवीस वर्षांखालील भारतीय संघात गोलरक्षक सुखदेव पाटील, आघाडीपटू निखिल कदम याची निवड झाली होती.

अंतिम २५ खेळाडूंची यादी 

  • गोलरक्षक : गुरप्रीत सिंग संधू, अमरिंदर सिंग, प्रभसुखन गिल.

  • बचावपटू : प्रीतम कोटल, सेरिटोन फर्नांडिस, राहुल भेके, हॉर्मिपम रुईवा, संदेश झिंगन, अन्वर अली, चिंगलेनसाना सिंग, सुभाषीश बोस, आकाश मिश्रा, रोशन सिंग.

  • मिडफिल्डर्स: अनिकेत जाधव, बिपिन सिंग, अनिरुद्ध थापा, प्रणय हलदर, जॅक्सन सिंग, ब्रँडन फर्नांडिस, व्ही. पी. सुहैर, दानिश फारूख, यासिर मोहम्मद .

  • फॉरवर्ड: मनवीर सिंग, लिस्टन कोलाको, रहीम अली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Update: LPG कनेक्शनबाबत सरकारची मोठी अपडेट! 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरवर काय निर्णय?

AI आणि रोबोट्समुळे नोकऱ्या धोक्यात! बिल गेट्स यांना चिंता; ‘ह्यूमन रिजर्व्ड’चा फॉर्म्युला सुचवला, आरक्षणाची मागणी

Pancreatic Cancer Breakthrough: कॅन्सर उपचारात महत्त्वाची बातमी! पॅनक्रियाटिक कॅन्सरविरोधात मोठं यश; नव्या औषधाला FDAची मंजुरी

शिवीगाळ करणाऱ्याला श्वेता तिवारीने शिकवला धडा; शोधून काढत लेखी माफीनामा घेतला

Numerology: गर्दीतही वेगळी ओळख! इतर लोकांपेक्षा वेगळा विचार का करतात 'या' मूलांकाचे लोक? ट्रेंड फॉलो करत नाहीत...

SCROLL FOR NEXT