FIFA World Cup Neymar sakal
क्रीडा

FIFA WC22: कोल्हापूरातील ब्राझीलप्रेमी हळहळले! चौका-चौकांतील स्क्रीनने आणली रंगत

कतार येथे सुरू असलेल्या फुटबॉल विश्वकरंडक स्पर्धेत ब्राझील आणि क्रोएशिया यांच्या सामन्यातील थरार आज रात्री कोल्हापूरकरांनी अनुभवला....

Kiran Mahanavar

FIFA World Cup Neymar 2022 : कतार येथे सुरू असलेल्या फुटबॉल विश्वकरंडक स्पर्धेत ब्राझील आणि क्रोएशिया यांच्या सामन्यातील थरार आज रात्री कोल्हापूरकरांनी अनुभवला. डी. वाय. पाटील ग्रुपतर्फे शहरातील रंकाळा टॉवर, खासबाग चौक, उभा मारुती चौक, शनिवार पेठ आदी आठ ठिकाणी विश्वकरंडक फुटबॉल सामने पाहण्यासाठी स्क्रीन उभारण्यात आले होते. ब्राझील संघाच्या पाठीराख्यांनी तेथे एकच गर्दी केली होती. शिट्ट्या, आरोळ्यांनी जल्लोष वाढत होता.

शहरातील तापमानाचा पारा खाली जात असताना फुटबॉल विश्वचषकाचे सामन्याने गर्मी वाढवली. कोल्हापूर फुटबॉलवेडे शहर म्हणून ओळखले जाते. संपूर्ण शहर फुटबॉलच्या रंगात न्हाऊन निघाले आहे. यासाठीच येथील फुटबॉलप्रेमींसाठी विविध ठिकाणी सामना लाइव्ह पाहण्यासाठी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली होती.

सामना पुढे सरकेल, तसा फुटबॉलप्रेमींची धाकधूक वाढत होती. अशातच सामना अत्यंत चुरशीचा ठरल्याने सामन्याचा निकाल कोणाच्या दिशेने जाईल, याचे वाद-प्रतिवाद होतच राहिले. मात्र, पूर्ण वेळ दोन्ही संघांमधील विजयाच्या झुंजीने फुटबॉलप्रेमींना खिळवून ठेवले. अखेर सामन्यात क्रिएशिया संघाने ४- २ गोलफरकाने विजय मिळविला व ब्राझील समर्थकांच्या पदरी निराशा पडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune DJ Sound : डीजेसाठी आग्रही मंडळांच्या मागणीपुढे पोलिसांची नरमाईची भूमिका; चार बेस, चार टॉपला परवानगीची तयारी

China Alerts: पुढील तीन दिवसांत पुन्हा महापुराचा धोका! चीनकडून नेपाळला इशारा, नेमका अलर्ट काय?

Pune Processions : मिरवणुकांमध्ये नियमांचे उल्लंघन; सहा ठिकाणी कारवाई, ध्वनिक्षेपक यंत्रणाही जप्त

BMC Politics: मुंबई महापालिकेत सत्ताबदलाची नांदी! सव्वावर्ष शिंदेसेनेचा महापौर बसणार? भाजपला धक्का देण्याची तयारी; ‘मिशन टायगर’ची चर्चा

Pune News : ‘बीपीसीएल’चा कचरा प्रकल्प स्थायीने अडवला; बिनाखर्चाच्या प्रस्तावासाठी विशेष सभा घेणार

SCROLL FOR NEXT