Ravindra Jadeja WI vs IND  esakal
क्रीडा

Ravindra Jadeja : ब्रेथवेटचा 'तो' चेंडू पाहून जडेजाने त्वरित मागवलं हेलमेट, विराटची प्रतिक्रिया तर...

अनिरुद्ध संकपाळ

Ravindra Jadeja WI vs IND : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारताने विंडीजचा एक डाव आणि 141 धावांनी पराभव केला. भारताने आपला पहिला डाव 5 बाद 421 धावांवर घोषित केला.

भारताने विंडीजचा पहिला डाव 150 तर दुसरा डाव 130 धावात संपवला होता. डॉमिनिकामधील विंड्सर पार्कची खेळपट्टी पहिल्या दिवसापासून फिरकीला साथ देत असल्याने भारतीय गोंदाजांनी सामना अवघ्या तीन दिवसात संपवला. (West Indies Vs India 1st Test)

भारताचा फिरकीपटू अश्विनने सामन्यात 12 विकेट्स घेत आपला दबदबा निर्माण केला. मात्र विंडीजच्या गोलंदाजांनीही भारतीय फलंदाजांना चांगलेच सतावले होते. वेस्ट इंडीजचा कर्णधार क्रेग ब्रेथवेटचा एका चेंडू असा काही बाऊन्स झाला की रविंद्र जडेजाचे धाबेच दणाणले.

त्याने त्वरित ड्रेसिंग रूमकडे हातवारे करत हेलमेटची मागणी केली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (Ravindra Jadeja)

भारताच्या पहिल्या डावात सलामीवीर रोहित शर्मा (103) आणि यशस्वी जैसवाल (171) यांनी विंडीजच्या गोलंदाजांना चांगले जेरीस आणले होते. त्यामुळे विंडीजचा कर्णधार क्रेग ब्रेथवेटने विकेटकिपर सोडून सर्वांचा गोलंदाज म्हणून वापर केला.

खुद्द त्यानेही ऑफ स्पिनर म्हणून गोलंदाजी केली. त्याला जरी फार प्रभावी मारा करता आला नसला तरी त्याच्या एका चेंडूने मात्र कमालच केली.

रविंद्र जडेजाला क्रिजच्या कोपऱ्यातून टालेला हा चेंडू हातभर वळला अन् त्याने चेंडूने घेतलेली उसळी पाहून कॅप घातलेल्या रविंद्र जडेजाने त्वरित हेलमेटची मागणी केली. हा चेंडू पाहून नॉन स्ट्राईकवर असलेल्या विराट कोहलीला देखील आपले हासू आवरता आले नाही.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salaried Employees: पगारदार वर्गासाठी दिलासादायक बातमी; आता 'या' सुविधांवर मिळणार मोठी करसवलत

Shivaji Maharaj : शिवाजी महाराजांच्या काळात कॉफी खरंच होती का? डच पाहुण्यांना नेमका कसा केला होता पाहुणचार?

Sleeping Problem: सतत झोप येतेय? यामागे ही आजारांची लक्षणं असू शकतात!

Maharashtra Latest News Live Update : पुण्यात राज ठाकरेंची महत्वाची बैठक, उद्या गंज पेठेतील सावित्रीबाई फुले स्मारक येथे होणार बैठक

Viral video: Cute कासवांचा गोपनीय मेळावा... व्हायरल व्हिडिओ पाहिला का?

SCROLL FOR NEXT