kuldeep yadav sakal
क्रीडा

विराट-कुंबळेंच्या वादाचे कारण ठरलेल्या चायनामनचा बर्थडे

Kiran Mahanavar

kuldeep yadav birthday : भारतीय क्रिकेटला महान फिरकी गोलंदाजांचा वारसा लाभला आहे. भारताने क्रिकेट विश्वाला अनेक ऑफ स्पिनर, लेग स्पिनर, लेफ्ट आर्म स्पिनर दिले. मात्र भारताच्या या महान फिरकीच्या इतिहासात चायनामन गोलंदाजाची कमी होती. ती कुलदीप यादवने भरुन काढली. आज भारताच्या पहिल्या चायनामन गोलंदाजाचा कुलदीप यादवचा २७ वा वाढदिवस आहे.

कुलदीप यादवने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन हॅट्ट्रिक घेणारा तो पहिला गोलंदाज आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 100 विकेट घेणारा तो जगातील 15 गोलंदाजांपैकी एक आहे. सिडनीच्या मैदानावर त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीमध्ये पाच विकेट्स घेण्याचा पराक्रमही केला आहे.

कुलदीप यादववरुनच विराट - कुंबळेमध्ये वाद

टीम इंडियाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि विराट कोहली यांच्यातील वादाची चर्चा खूपदा होते. काही खेळाडूंची कारकिर्द संपवल्याचा आरोप विराट आणि शास्त्रींवर केला जातो. यात कुलदीप यादवच्या नावाचाही समावेश आहे.

ऑस्ट्रेलियन संघ 2017 मध्ये भारत दौऱ्यावर आला होता. पुण्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा मोठ्या फरकाने पराभव केला. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत दमदार पुनरागमन केले. 4 सामन्यांची ही मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली होती.

तिसरी कसोटी रांची येथे खेळवली जाणार होती. या दौऱ्याच्या काही महिन्यांपूर्वीच प्रशिक्षण म्हणून अनिल कुंबळे यांची नियुक्ती करण्यात आली होती. पण हा कसोटी सामना भारतीय संघात वादाचे कारण ठरला. या सामन्यात खेळाडूची निवड कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यातील वादाचे मूळ ठरले. मालिका 1-1 अशी बरोबरीत असताना रांची कसोटी भारतीय संघासाठी महत्त्वाची होती. या सामन्यात कुलदीपला संधी मिळणार अशी चर्चाही रंगली. पण झाले काही वेगळेच. प्रशिक्षक कुंबळे यांना या कसोटीत चायनामन गोलंदाज कुलदीप यादवला मैदानात उतरवायचे होते. पण कर्णधाराने याला विरोध केला. शेवटी कुलदीपला रांची कसोटीत बाकावच बसावे लागले. याचा फटका टीम इंडियाला बसला. हा सामनाही बरोबरीत सुटला. पण या घटनेमुळे कर्णधार आणि प्रशिक्षक यांच्यातील वाद चव्हाटयावर आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT