Kuldeep Yadav esakal
क्रीडा

Kuldeep Yadav : W, W, 0, W, W... बर्थडे बॉय कुलदीपनं इतिहास रचला; भारताकडून अशी कामगिरी करणारा ठरला पहिला फिरकीपटू

अनिरुद्ध संकपाळ

Kuldeep Yadav : भारताचा डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिसऱ्या टी 20 सामन्यात कमाल केली. त्याने फक्त 2.5 षटकात 17 धावा देत आफ्रिकेचा निम्मा संघ गारद केला. कुलदीपच्या या गोलंदाजीमुळे भारताने टी 20 क्रिकेटमधील आपला आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय मिळवला. भारताने तिसरा सामना 106 धावांनी जिंकत मालिका 1 - 1 अशी बरोबरीत सोडवली.

कुलदीप यादवने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध 5 विकेट्स घेत इतिहास रचला. आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये निम्मा संघ गारद करण्याची ही कुलदीपची दुसरी वेळ आहे. याचबरोबर भारताकडून टी 20 मध्ये दोनवेळा निम्मा संघ गारद करण्याची किमया करणारा कुलदीप यादव हा पहिला फिरकी गोलंदाज ठरला आहे.

कुलदीप सोबतच भारताचा स्टँड इन कॅप्टन रविंद्र जडेजाने देखील 2 विकेट्स घेतल्या. सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेल्याने रविंद्र जडेजाने आजच्या सामन्यात फिल्डिंग करताना कॅप्टन्सी केली.

जडेजा सोबतच अर्शदीप सिंग, मुकेश कुमार यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. भारताकडून फलंदाजी करताना कर्णधार सूर्यकुमारने दमदार शतकी खेळी केली तर यशस्वी जयस्वालने 60 धावांचे योगदान दिले. रिंकू सिंहने 10 चेंडूत 14 धावा केल्या.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये दुष्काळाचं सावट; दर मिळत नसल्याने शेतकऱ्याने दोन एकर केळीची बाग केली उद्ध्वस्त

Babar Azam : बाबर आझम पुन्हा स्वस्तात बाद, बाऊंड्रीवरच चाहत्यांनी त्याला घेरले, सपोर्ट स्टाफ पळत आला अन्... Video Viral

SCROLL FOR NEXT