Kuldeep Yadav West Indies Vs India 1st ODI  esakal
क्रीडा

Kuldeep Yadav : षटके तीन विकेट्स चार! अवघ्या 23 षटकात गाशा गुंडाळला; विंडीजने सामना केला कंटाळवाणा

अनिरुद्ध संकपाळ

West Indies Vs India 1st ODI : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात वेस्ट इंडीजने अत्यंत खराब फलंदाजी केली. विंडीजचा संपूर्ण संघ 23 षटकातच 114 धावा करत पॅव्हेलियनमध्ये परतला. भारताच्या कुलदीप यादवने विंडीजच्या संघाला आपल्या तालावर नाचवले. त्याने अवघ्या 6 धावात 4 विकेट्स घेत कुलदीपने वर्ल्डकपसाठी टीम इंडियात आपली दावेदारी सादर केली. (Kuldeep Yadav News)

भारताकडून रविंद्र जडेजा 3 आणि कुलदीप यादव यांना 4 बळी टिपले. तर हार्दिक पांड्या, मुकेश कुमार आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. विंडीजकडून कर्णधार शे होप शेवटपर्यंत झुंज देत होता. मात्र कुलदीप यादवने त्याची खेळी 43 धावांवर संपवली. वेस्ट इंडीजकडून होपनंतर सर्वाधिक धावा या अलिक अथनाजेने केल्या. त्याने 22 धावांचे योगदान दिले.

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नवीन चेंडू टाकणाऱ्या हार्दिक पांड्याने कायल मेयर्सला 2 धावांवर बाद करत विंडीजला पहिला धक्का दिला होता. त्यानंतर वनडे पदार्पण करणाऱ्या मुकेश कुमारने आपले विकेट्सचे खाते उघडले. त्याने अथनाजेला 22 धावांवर बाद करत विंडीजचे भागीदारी रचण्याचे मनुसबे उधळून लावले.

यानंतर 23 चेंडूत 17 धावा करणाऱ्या ब्रँडन किंगचा शार्दुल ठाकूरने त्रिफळा उडवत विंडीजची अवस्था 3 बाद 45 अशी केली. विंडीजचा कर्णधार शे होप आणि स्टार फलंदाज हेटमायर यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला.

मात्र रविंद्र जडेजाने हेटमायरची 11 धावांवर शिकार करत ही जोडी फोडली. जडेजाने रोव्हमन पॉव्हेलला 4 धावावर बाद केले तर शेफर्डला भोपळाही फोडण्याची संधी दिली नाही. विंडीजची अवस्था 6 बाद 96 अशी झाली होती.

जडेजाच्या फिरकीचा सामना करताना तारांबळ उडालेल्या विंडीजला कुलदीप यादवने एका पाठोपाठ एक धक्के देण्यास सुरूवात केली. त्याने अवघ्या 3 षटकात फक्त 6 धावा देत चार बळी टिपले. यात विंडीजचा कर्णधार शे होपचा महत्वाचा बळी देखील होता. होपने 43 धावांची खेळी करत विंडीजला शंभरी पार करून दिली होती. मात्र त्याला दुसऱ्या बाजूने साथ मिळाली नाही. विंडीजचे सात फलंदाज दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: भर पावसात फूड डिलिव्हरी बॉय पडला पाण्यात; पुण्यातला व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल

KKR vs SRH Live : पुन्हा २०० पार... ट्रॅव्हिस, अभिषेक, हेनरिच, नितीश यांची तुफान फटकेबाजी; कोलकातासमोर तगडे लक्ष्य

Sack Weight Limit: महाराष्ट्रात मोठा निर्णय! बाजार समित्यांमध्ये ५० किलोपेक्षा जास्त गोण्यांवर बंदी; माथाडी कामगारांना दिलासा

Iran-Israel War: मोदींचा मास्टरस्ट्रोक! होर्मुजला शोधला पर्याय, आता तेलासाठी थेट पाईपलाईनच टाकणार; 'ब्लूप्रिंट' रेडी

११ महिन्यांच्या बाळाचा बादलीत बुडून मृत्यू, मीच जबाबदार; चिठ्ठी लिहून WFH करणाऱ्या इंजिनिअर आईनं स्वत:ला संपवलं

SCROLL FOR NEXT