Kuldeep Yadav Bageshwar Dham esakal
क्रीडा

Kuldeep Yadav : वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाण्यापूर्वी कुलदीप 'वादग्रस्त' धीरेंद्र शास्त्रींच्या चरणी लीन

अनिरुद्ध संकपाळ

Kuldeep Yadav Bageshwar Dham : भारताचा वेस्ट इंडीज दौरा 12 जुलैपासून सुरू होत आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ दोन कसोटी, तीन वनडे आणि पाच टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघात कुलदीप यादवची देखील निवड झाली आहे. विंडीज दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी कुलदीप यादवने वादग्रस्त बागेश्वर धाम सरकारला भेट दिली. याबाबतचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

कुलदीप यादव हा बागेश्वर महाराज यांच्या जन्मोत्सवावेळी तेथे गेला होता. याबाबतचे ट्विट बागेश्वर सरकारच्या अधिकृत अकाऊंटवरून करण्यात आले आहे. हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. या फोटोत कुलदीप यादव हा धीरेंद्र शास्त्रींच्या पायापाशी बसला असून त्याच्या गळ्यात एक पिवळ्या रंगाचा गमछा देखील आहे.

बागेश्वर धाम सरकार आपल्या अधिकृत ट्विटमध्ये म्हणते की, 'भारतीय क्रिकेटचा फरिकी जादूगार आणि पूज्य सरकारांचे लाडके कुलदीप यादव यांनी धामला भेट दिली. त्यांनी बागेश्वर सरकारच्या जन्मोत्सव साजरा केला. त्याने सरकारांचा आशीर्वाद देखील घेतला.'

भारत विंडीज दौऱ्यावर तीन वनडे आणि पाच टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दोन मालिकांसाठी कुलदीप यादवची भारतीय संघात निवड झाली आहे.

भारताचा वनडे संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या(उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, इशान किशन (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, जयदेव उनाडकट.

भारताचा टी 20 संघ :

इशान किशन, शुभमन गिल, यशस्वी जैसवाल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान, मुकेश कुमार.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

Scorpio कारमध्ये माजी सरपंचासह 4 जणांना जिवंत जाळलं; दुमडलेली सीट, रक्तानं माखलेली आगपेटी अन् विटांवर रक्ताचे डाग.., घातपाताचा संशय बळावला!

Kolhapur Crime : शेतात कामासाठी गेलेल्या महिलेवर अतिप्रसंग, शरीरसुखास नकार दिल्याने निर्घृण खून; खिशावरील 'त्या' डागाने उलगडलं धक्कादायक रहस्य

Pune News : पुणे शहरात सिमेंट काँक्रिट उखडले; रस्त्यावर पुन्हा खड्डे

Pali Census : 40 ते 42 अंश सेल्सिअस तापमानात 'सुपरहिरो' बनून फिरतायत शिक्षक; उन्हाच्या लाहीलाहीतही जनगणनेचे राष्ट्रीय कर्तव्य अविरत सुरू

SCROLL FOR NEXT