Mark Wood Kyle Mayers ipl 2023 LSG vs DC
Mark Wood Kyle Mayers ipl 2023 LSG vs DC esakal
क्रीडा

IPL 2023 LSG vs DC : मार्क वूडचा पंजा! दिल्लीच्या दांड्या गुल, वॉर्नरने अर्धशतक तरी दिल्लीचा दारूण पराभव

अनिरुद्ध संकपाळ

Mark Wood Kyle Mayers ipl 2023 LSG vs DC : लखनौ सुपर जायंट्सने बलाढ्य समजल्या जाणाऱ्या दिल्लीचा 50 धावांनी पराभव करत आपल्या होम ग्राऊंडवरील पहिला सामना जिंकला. दिल्लीला 20 षटकात 9 बाद 143 धावाच करता आल्या. लखनौकडून मार्क वूडने भेदक मारा करत 4 षटकात 14 धावा देत 5 विकेट घेतल्या. यंदाच्या हंगामातील हा पहिला पंजा आहे. दिल्लीकडून कर्णधार डेव्हिड वॉर्नरने 48 चेंडूत 56 धावांची खेळी केली.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या लखनौने सलामीवीर कायल मेयर्सच्या तडाखेबाज 73 धावांच्या जोरावर 193 धावांपर्यंत मजल मारली. शेवटच्या षटकात आयुष बदोनीने 7 चेंडूत 18 धावा करत आपला प्रभाव पाडला. तर निकोलस पूरनने 36 धावांचे योगदान दिले. दिल्लीकडून खलील अहमद आणि चेतन साकरिया यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

लखनौ सुपर जायंट्सने दिल्ली कॅपिटल्स समोर ठेवलेल्या 194 धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीने आक्रमक सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. सलामीवीर पृथ्वी शॉ आणि डेव्हिड वॉर्नर यांनी पहिल्या 4 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर दिल्लीची गाडी रुळावरून घसरली.

दिल्लीची गाडी रूळावरून घसरवली ती मार्क वूडने! त्याने पृथ्वी शॉला आधी शॉर्ट बॉल टाकून सतावले. त्यानंतर एक चेंडू गूडलेंथवर टाकत शॉची दांडी गुल केली. पुढच्याच चेंडूवर मार्क वूडच्या वेगवान चेंडूने मिचेल मार्शला देखील चकवा दिला अन् त्याचीही स्टंप मुळापूसन उखडली. वूडने पाठोपाठ दोन धक्के दिल्याने दिल्ली मंदावली.

यानंतर पुढच्या षटकात मार्कने सूर्यकुमार यादव होऊ पाहणाऱ्या सरफराज खानला चालतं केलं. यामुळे दिल्लीची अवस्था 3 बाद 48 अशी झाली. या पडझडीनंतर दिल्लीचा कर्णधार वॉर्नर आणि रूसो यांनी डाव सावरत संघाला 12 व्या षटकात 86 धावांवर पोहचवले. मात्र रवी बिश्नोईने आक्रमक 30 धावा करणाऱ्या रूसोला बाद करत ही जोडी फोडली. दरम्यान, आपल्या अर्धशतकाजवळ पोहचलेल्या वॉर्नरने आपले अर्धशतक पूर्ण केले.

मात्र या अर्धशतकाचा फारसा फायदा दिल्लीला झाली नाही. धावगती मंदावत केल्याने दिल्लीचे इतर फलंदाज हे त्या दबावाखालीच बाद झाले. अखेर वॉर्नरची खेळी आवेश खानने संपवत दिल्लीला पराभवाच्या खाईत लोटले. वॉर्नर नंतर अक्षर पटेलने प्रतिकार केला मात्र तोपर्यंत सामना लखनौच्या पारड्यात पडला होता.

तत्पूर्वी, आयपीएल 2023 मध्ये आज दुसरा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जात आहे. लखनौ सुपर जायंट्स घरच्या मौदानावर आपला पहिला सामना खेळत आहे. दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम लखनौला फलंदाजीला पाचारण केले. लखनौचा कर्णधार केएल राहुलने वेस्ट इंडीजच्या कायल मेयर्ससोबत सलामी दिली. मायर्सचा हा आयपीएलमधील पहिलाच सामना होता.

मात्र या पहिल्याच सामन्यात मेयर्सने आपली ताकद दाखवून दिली. त्याने दिल्लीच्या प्रत्येक गोलंदाजाची यथेच्छ धुलाई करत आपली गुणवत्ता पहिल्याच सामन्यात जगमासमोर ठेवली. मेयर्सने अवघ्या 38 चेंडूत 73 धावांची तुफानी खेळी करत लखनौला 12 व्या षटकात शतकी मजल मारून दिली. मात्र मेयर्सची ही 7 षटकार आणि 2 चौकारांनी सजलेली खेळी अखेर अक्षर पटेलने संपवली. अक्षरने मेयर्सचा त्रिफळा उडवताच खलील अहमदचा जीव भांड्यात पडला. कारण खलीलने मेयर्सला 14 धावांवर असताना झेल सोडत जीवनदान दिले होते.

मेयर्स बाद झाल्यानंतर लखनौची धावगती मंदावली. खलील अहमदने आपली फिल्डिंगमधील चूक गोलंदाजीत भरून काढत मार्कस स्टॉयनिसला 12 तर धोकादायक निकोलस पूरनला 36 धावांवर बाद केले. मात्र दुसऱ्या बाजूने कृणल पांड्या सावध फलंदाजी करत होता. त्याला साथ देण्यासाठी आलेल्या आयुष बदोनीने लखनौ सुपर जायंट्सला 20 षटकात 193 धावांपर्यंत पोहचवले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदेंचा दणका; अंबरनाथचे काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांचा 7 माजी नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश!

Share Market Today: जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत; आज कोणते 10 शेअर्स असतील ॲक्शनमध्ये?

Irrfan Khan: जेव्हा राजेश खन्ना यांच्या घरी AC दुरुस्त करायला गेला होता इरफान खान; हा किस्सा माहितीये का?

Besan Pohe Cutlet : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा चवदार बेसन पोहे कटलेट, वाचा सोपी रेसिपी

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

SCROLL FOR NEXT