FIFA World Cup 2022 France Defeat Denmark esakal
क्रीडा

FIFA World Cup 2022 : अखेर एम्बाप्पे धावला! डेन्मार्कने विश्वविजेत्यांना पहिल्या गोलसाठी 60 मिनिटे झुंजवले

अनिरुद्ध संकपाळ

FIFA World Cup 2022 France Defeat Denmark : विश्वविजेत्या फ्रान्सने डेन्मार्कचा 2 - 0 असा पराभव करत साखळी फेरीतील आपला सलग दुसरा सामना जिंकला. याचबरोबर फ्रान्सने आपले राऊंड 16 मधील स्थान देखील पक्के केले. फ्रान्स ग्रुप 16 मध्ये स्थान मिळवणारी पहिली टीम ठरली. आजच्या सामन्यात स्टार फुटबॉलर कायलन एम्बाप्पेने फ्रान्सकडून दोन गोल केले. मात्र डेन्मार्कनेही दमदार बचाव करत फ्रान्सला पहिल्या गोलसाठी तब्बल 60 मिनिटे दमवले. डेन्मार्ककडून ख्रिस्टेन्सनने 68 व्या मिनिटाला गोल करत बरोबरी साधली होती. मात्र एम्बाप्पे फ्रान्ससाठी धावून आला आणि त्याने 86 व्या मिनिटाला दुसरा गोल करत आघाडी मिळवून दिली.

फिफा वर्ल्डकप ग्रुप D मधील आजच्या सामन्यात डेन्मार्कने पहिल्या हाफमध्ये विश्वविजेत्या फ्रान्सचे आक्रमण यशस्वीरित्या परतवून लावले. फ्रान्सच्या पॉवर पॅक्टसंघाला डेन्मार्कचा बचाव काही केल्या भेदता आला नाही. फ्रान्सने पहिल्या हाफमध्ये चार फॉरवर्ड घेऊन सुरुवात केली. मात्र त्यांना डेन्मार्कची बचावफळी भेदता आली नाही. पहिला हाफ गोलशून्य बरोबरीतच राहिला. फ्रान्सकडून तब्बल 13 वेळा डेन्मार्कच्या गोलपोस्टवर चाल केली. त्यातील 3 वेळा तर शॉट्स ऑन टार्गेट राहिले. मात्र पहिल्या हाफमध्ये बचावावर भर देणाऱ्या डेन्मार्कने आपली गोलपोस्ट भेदण्याची संधी दिली नाही. बॉल पजेशन, पासिंग अॅक्युरसीच्या बाबतीत डेन्मार्क फ्रान्सपेक्षा थोडे उजवा ठरले.

दुसऱ्या हाफमध्ये विश्वविजेत्या फ्रान्सने पुन्हा एकदा डेन्मार्कच्या गोलपोस्टवर दबाव निर्माण करण्यास सुरूवात केली. मात्र डेन्मार्कच्या दमदार बचावासमोर त्यांची डाळ शिजत नव्हती. अखेर फ्रान्सच्या स्टार फुटॉबलपटू एम्बाप्पेने 61व्या मिनिटाला हेर्नांड्सच्या सहाय्याने डेन्मार्कवर पहिला गोल केला. या दोघांनी डाव्या बाजूने डेन्मार्कच्या गोलपोस्टवर चढाई केली होती. मात्र फ्रान्सच्या या पहिल्या गोलंचा आनंद फारकाळ टिकला नाही. अवघ्या सात मिनिटातच एरिक्सनच्या कॉर्नर किकवर अँडरसनने आंद्रिआस ख्रिस्तेनसेनला अचूक पास दिला. त्यावर आंद्रिआसने गोल करत सामना 1 - 1 असा बरोबरीत आणला.

ही 1 - 1 ची बरोबरी जवळपास 85 मिनिटापार्यंत चालली. त्यावेळी वाटले की डेन्मार्क विश्वविजेत्या फ्रान्सला बरोबरीतच रोखणार. मात्र 86 व्या मिनिटाला ग्रिजमनच्या पासवर एम्बाप्पेने फ्रान्सचा आणि आपलाही दुसरा गोल डागत आघाडी घेतली. फ्रान्सने ही 1 गोलची आघाडी सामना संपेपर्यंत अबाधित राखत सामना जिंकला. तसेच ग्रुप 16 मध्ये देखील प्रवेश केला.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! आठव्या वेतन आयोगानुसार किमान 'इतका' असेल पगार, आकडा आला समोर

IND vs NZ 3rd T20I : भारताने जिंकली सलग नववी ट्वेंटी-२० मालिका! अभिषेक, सूर्यकुमारच्या वादळासमोर न्यूझीलंडचा पालापाचोळा

Accident News: भीषण अपघात! महामार्गावर दोन बसची समोरासमोर टक्कर; तिघांचा मृत्यू, अनेक जखमी

Indian Video : भारताला स्वातंत्र्य 99 वर्षांच्या करारावर मिळालंय? 2046 मध्ये इंग्रज परत येणार? वादग्रस्त व्हिडिओतील वक्तव्य कितपत खरं

Latest Marathi news Update : देश-विदेशातील दिवसभरातील घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT