Laal Singh Chaddha Virender Sehwag Suresh Raina Give Review esakal
क्रीडा

Laal Singh Chaddha : चित्रपट पाहिल्यावर विरेंद्र सेहवाग, सुरेश रैना म्हणाले...

अनिरुद्ध संकपाळ

Virender Sehwag And Suresh Raina Laal Singh Chaddha Review : आमिर खानची मुख्य भुमिका असलेल्या लाल सिंग चढ्ढा आज चित्रपट गृहात झळकला. सोशल मीडियावर या चित्रपटावर बहिष्कार घालावा अशी मोहिम सुरू केली होती. यादरम्यान, चित्रपट प्रदर्शित झाल्या झाल्या भारताचे माजी खेळाडू विरेंद्र सेहवाग आणि सुरेश रैंना यांनी हा चित्रपट पाहिला. या दोघांनीही या चित्रपटावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

लाल सिंग चढ्ढाच्या स्क्रीनिंगचा एक व्हिडिओ आमिर खानने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला. या व्हिडिओत चित्रपटाबद्दल प्रेक्षकांनी आपली प्रतिक्रिया दिल्या. या प्रेक्षकांमध्ये विरेंद्र सेहवाग आणि सुरेश रैना यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली.

चित्रपट पाहिल्यानंतर विरेंद्र सेहवाग म्हणाला की, हा चित्रपट मोठ्या पडद्यावर धमाल करण्यास तयार आहे. या चित्रपटाने भारतीय प्रेक्षकांच्या भावनांना चांगल्या पद्धतीने साद घातली आहे. जर तुम्ही आमिर खानचा चित्रपट पाहण्यासाठी जात असाल तर त्यांच्या अभिनयाबाबत विचार करण्याची गरजच नाही. मात्र लाल सिंग चढ्ढा जबरदस्त व्यक्तीमत्व आहे. आमिरचा अभिनयही दमदार आहे. मला चित्रपट खूप चांगला वाटला.'

दरम्यान, सुरेश रैनाने देखील या चित्रपटाबाबत आपले मत व्यक्त केले. तो म्हणाला, 'सर्वात मोठी बाब म्हणजे ही एक लव्ह स्टोरी आहे. यातील गाणी देखील चांगली आहेत. चित्रपट पाहून मजा आली. आमिर भाई हार्दिक शुभेच्छा. आता हा चित्रपट प्रदर्शित होण्याची आणि प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांची प्रतिक्षा असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT