Lagori Competition sakal
क्रीडा

Lagori Competition : गोव्यातील राष्ट्रीय स्पर्धेत लगोरी प्रदर्शनीय खेळ

गोव्यात यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत एकूण ४३ खेळांचा विक्रमी सहभाग असेल, त्यात देशातील पारंपरिक खेळांचेही पदार्पण होईल.

प्रतिनिधी

गोव्यात यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत एकूण ४३ खेळांचा विक्रमी सहभाग असेल, त्यात देशातील पारंपरिक खेळांचेही पदार्पण होईल.

पणजी - गोव्यात यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत एकूण ४३ खेळांचा विक्रमी सहभाग असेल, त्यात देशातील पारंपरिक खेळांचेही पदार्पण होईल. रोल बॉल, पेंचाक सिलाट, स्क्वे मार्शल आर्ट, काल्लियारापट्टू हे परंपरागत खेळ, तसेच लगोरी आणि गतका हे प्रदर्शनीय खेळ असतील.

३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या लोगोचे शानदार समारंभात रविवारी अनावरण झाले. त्यावेळी राज्याचे क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या (आयओए) परवानगीने स्पर्धेतील ४३ खेळांची यादी जाहीर केली. गतवर्षी गुजरातमध्ये झालेल्या ३६व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत एकूण ३६ खेळांचा समावेश होता, तर त्यापूर्वी २०१५ साली केरळमधील स्पर्धेत ३३ खेळ होते. ‘‘गोव्यात होणाऱ्या ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत एकूण ४३ खेळ असतील आणि स्पर्धेच्या इतिहासातील हा विक्रम आहे,’’ असे लोगो अनावरण कार्यक्रमात भारतीय ऑलिंपिक संघटनेचे (आयओए) संयुक्त सचिव कल्याण चौबे यांनी सांगितले.

स्पर्धेतील नव्या खेळांविषयी

आयओए तांत्रिक समिती शिष्टमंडळ मार्च महिन्यात गोवा भेटीवर आले असता रोल बॉल, पेंचाक सिलाट, स्क्वे मार्शल आर्ट व लगोरी या खेळाचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले होते. पुणे येथील राजू दाभाडे यांनी प्रस्थापित केलेला रोल बॉल हा भारतीय खेळ आहे. पेंचाक सिलाट हा मार्शल आर्ट खेळ आहे. स्क्वे मार्शल आर्ट हा काश्मीरमधील जुनापुराणा आहे. गोव्याने या खेळात राष्ट्रीय पातळीवर सातत्याने पदके जिंकली आहेत. लगोरी या देशी पारंपरिक खेळाच्या राष्ट्रीय स्पर्धेतील समावेशासाठी गोव्याने जोर लावला होता. गतका हा पंजाबमध्ये खूप लोकप्रिय असलेला प्राचीन मार्शल आर्ट खेळ आहे, तर काल्लियारापट्टू हा केरळमध्ये विकसित झालेला भारतीय मार्शल आर्ट खेळ आहे.

गोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील खेळ

जलतरण, तिरंदाजी, ॲथलेटिक्स, बॅडमिंटन, बास्केटबॉल, बिलियर्डस-स्नूकर, बॉक्सिंग, कनोईंग-कयाकिंग, सायकलिंग, फुटबॉल व बीच फुटबॉल, तलवारबाजी, गोल्फ, जिम्नॅस्टिक्स, हँडबॉल व बीच हँडबॉल, हॉकी, ज्युदो, कबड्डी, खो-खो, लॉन बॉल्स, मॉडर्न पेंटॅथलॉन, नेटबॉल, रोईंग, रग्बी, सेपॅक टॅक्रो, नेमबाजी, स्क्वॉश, टेबल टेनिस, तायक्वांदो, टेनिस, ट्रायथलॉन, व्हॉलिबॉल व बीच व्हॉलिबॉल, वेटलिफ्टिंग, कुस्ती, वुशू, यॉटिंग, रोल बॉल, योग, मल्लखांब, पेंचाक सिलाट, स्क्वे मार्शल आर्ट, कालारीपायाट्टू, लगोरी (प्रदर्शनीय), गतका (प्रदर्शनीय).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ'ची दादागिरी संपणार? पुतीन यांची भारताला मोठी ऑफर! दोन्ही देशांना सापडला नवा व्यापारी मार्ग

Charas Seized : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक कोटींचे चरस जप्त; बँकॉकहून आलेल्या महिला प्रवाशाकडून कॉस्मेटिकच्या डब्यांतून तस्करी

Lohgaon News : लोहगाव अत्याचार प्रकरण; आरोपीला कठोर शिक्षेची डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी

Nagpur Crime : अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीचा खून; आरोपीला अटक, दोन महिन्यांपूर्वी आला होता कारागृहातून सुटून

CJP Protest Shivaji Park : अभिजित दिपके मुंबई पोलिसांच्या रडारवर? शिवाजी पार्कवरील आंदोलन बेकायदेशीर?; CJPच्या चार पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार

SCROLL FOR NEXT