Lakshya Sen miss to create history after lost final  esakal
क्रीडा

लक्ष्यचे 21 वर्षाचा दुष्काळ संपवण्याचे 'टार्गेट' थोडक्यात चुकले

सकाळ डिजिटल टीम

बर्मिंगहॅम: भारताचा 20 वर्षाच्या लक्ष्य सेनने (Lakshya Sen) ऑल इंग्लंड बॅडमिंटन ओपनमध्ये धडाकेबाज कामगिरी करत फायनल गाठली होती. भारतीय खेळाडूने ऑल इंग्लंड ओपनमध्ये (All England Badminton Open) तब्बल 21 वर्षानंतर फायनल गाठली होती. त्यामुळे लक्ष्य सेन प्रकाश पदुकोन आणि पुलेला गोपिचंद यांचा कित्ता गिरवत प्रतिष्ठेची ऑल इंग्लंड ओपन जिंकेल अशी आस होती. मात्र जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या व्हिक्टर अॅक्सेलसेनने (Viktor Axelsen) लक्ष्यला टार्गेटपासून दूर ठेवले. व्हिक्टरने लक्ष्यचा 21-10, 21-15 असा पराभव (Defeat) केला.

ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या व्हिक्टर अॅक्सेलसेन युवा लक्ष्य सेनचा 53 मिनिटात पराभव केला. पहिल्या गेममध्ये व्हिक्टरने सेनवर 6-0 अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर व्हिक्टरने पहिला गेम 21-10 अशा मोठ्या फरकाने जिंकला. दुसऱ्या गेममध्ये लक्ष्यने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र अनुभवी व्हिक्टरने दुसरा गेम देखील 21-15 अशा फरकाने जिंकत लक्ष्य सेनचे 21 वर्षाचा दुष्काळ संपवण्याचे स्वप्न धुळीस मिळवले.

लक्ष्य सेन प्रतिष्ठेच्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन ओपन स्पर्धेची फायनल खेळणारा प्रकाश नाथ (1974) प्रकाश पदुकोन (1980), पुलेला गोपिचंद (2001) आणि सायना नेहवाल (2015) यांच्यानंतरचा फक्त पाचवा बॅडमिंटनपटू होता. ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा ही सर्वात जुनी आणि प्रतिष्ठेची बॅडमिंटन स्पर्धा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Alert: 60 किलोमीटरच्या वेगाने दिल्लीच्या दिशेने येतेय वादळ! 'नोएडा'सह लगतची शहरं अंधारात

Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना मोठी भेट! मुंबईतून पुन्हा धावणार ‘मोदी एक्स्प्रेस’; बुकिंग कधीपासून? पाहा संपूर्ण वेळापत्रक

Nepal Floods: हिमालय धोक्यात? नेपाळच्या महापुराने वाढवली भारताची चिंता! नेमकं काय घडतंय?

Bank Holiday: रक्षाबंधनला बँका बंद की सुरू? पाहा RBI काय सांगते

IND vs SL: फॉलोऑन देऊनही फसला प्लॅन! भारताच्या हातातून विजय निसटला, दिनूशा एकटा नडला; कोलंबो कसोटी 'ड्रॉ'

SCROLL FOR NEXT