Commonwealth Games 2022 Lakshya Sen Badminton  esakal
क्रीडा

CWG 2022 Lakshya Sen : लक्ष्य सेनचा सुवर्ण वेध; भारताचे बॅडमिंटनमधील दुसरे गोल्ड

अनिरुद्ध संकपाळ

Commonwealth Games 2022 Lakshya Sen Badminton : भारताने राष्ट्रकुल स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी देखील सुवर्ण धडाका कायम ठेवला. लक्ष्य सेनने बॅडमिंटनमध्ये पुरूष एकेरीत सुवर्ण पदक जिंकले. लक्ष्य सेनने बॅडमिंटन पुरूष एकेरीच्या अंतिम सामन्यात मलेशियाच्या ची याँग एनजीचा 21 -19, 9 -21, 16 - 21 अशा तीन गेममध्ये पराभव करत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. लक्ष्य सेन अवघ्या 20 वर्षाचा आहे. त्याने राष्ट्रकुल स्पर्धेत पहिल्याच प्रयत्नात सुवर्ण पदकाला गवसणी घातली.

पीव्ही सिंधूने महिला एकेरीत यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेतील बॅडमिंटनमधील पहिले सुवर्ण पदक जिंकले. त्यानंतर लगेचेच भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन आणि मलेशियाच्या ची याँग एनजी यांच्यात पुरूष एकेरीची फायलन झाली.

लक्ष्य सेन मलेशियाच्या याँग एनजी याच्याविरूद्ध पहिल्या गेममध्ये सुरूवातीला पिछाडीवर पडला होता. मात्र त्याने नंतर गुणांमधील अंतर कमी करत आणले. लक्ष्यने झुंजार खेळ करत 18 - 18 अशी बरोबरी देखील केली. मात्र अखेरीस याँग एनजीने 21 - 19 असा विजय मिळवला.

त्यानंतर दुसऱ्या गेममध्ये याँगने एक गुण घेऊन आघाडी घेतली. मात्र सेनने आक्रमक खेळ करत दोन गुणांची कामाई केली. मात्र याँगने पुन्हा 2 - 2 अशी बरोबरी केली. त्यानंतर तिसरा गुण मिळवत मलेशियाच्या शटलरने आघाडी घेण्याचा प्रयत्न केला मात्र सेनने पुन्हा 3 - 3 अशी बरोबरी केली. हा आघाडी बरोबरीचा पाठशिवणीचा खेळ सुरूच राहिला. लक्ष्य सेनने पिछाडी भरून काढत 6 - 6 अशी बरोबरी केली.

लक्ष्य सेन आणि याँगच्यातील अटी-तटीच्या सामन्यात दोघांच्या जबरदस्त रॅली झाल्या. लक्ष्य सेनने 8 - 8 बरोबरीनंतर 10 - 8 अशी आघाडी घेतली. दुसऱ्या गेमच्या मध्यापर्यंत लक्ष्य सेनने याँगची सर्विस ब्रेक करत 11 - 9 अशी आघाडी घेतली.

ब्रेकनंतर लक्ष्य सेनने आक्रमक खेळ करत याँगला पिछाडीवर टाकण्यास सुरूवात केली. त्याने आपली आघाडी 16 - 9 अशी आघाडी घेतली. दुसऱ्या गेममध्ये लक्ष्यने जोरादार मुसंडी मारली. त्याने दुसरा गेम 21 - 9 ने जिंकत सामन्यावर आपली पकड पुन्हा निर्माण केली.

दुसऱ्या गेममध्ये देखील लक्ष्य सेन आणि ची याँग यांनी सुरूवात 1 - 1, 2 - 2, 3- 3 अशी बरोबरी साधत केली. सामन्याचा निर्णायक गेममध्ये देखील लक्ष्य आणि याँगमध्ये एक एक गुणासाठी चुरस निर्माण झाली होती. मात्र लक्ष्य सेनने आपल्या आक्रमक खेळाने यांगला मागे टाकण्यास सुरुवात केली. त्याने 7 - 4 अशी आघाडी घेतली. लक्ष्यने ही आघाडी तिसऱ्या गेमच्या मध्यापर्यंत 11 - 7 अशी 4 गुणांची आघाडी घेतली.

तिसऱ्या गेमच्या दुसऱ्या हाफमध्ये ची याँगने कडवी झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र लक्ष्य सेनने याँगला आघाडी घेऊन दिली नाही. लक्ष्यने तिसऱ्या गेममधील आपली आघाडी 15 - 9 पर्यंत नेली. मात्र त्यानंतर ची याँगने झुंजार खेळ करत ही आघाडी 15 - 12 अशी कमी केली. परंतु लक्ष्यने याँगचा गुण घेण्याचा धडाका मोडून काढत आघाडी 17 - 12 अशी वाढवली. याँग आणि सेन यांच्यात गोल्ड मेडल मिळवण्यासाठी जबरदस्त रॅली सुरू होत्या.

दरम्यान, याँगने दुखापतीमुळे ब्रेक घेतला. मात्र याचा फायदा त्याला झाला नाही. लक्ष्य सेन आपली आघाडी 19 - 14 अशी वाढवत सुवर्ण पदकाच्या जवळ पोहचला. मात्र यांगने पुन्हा हार न मानता दोन गुण मिळवत सामना 19 - 16 असा जवळ आणण्याचा प्रयत्न केला. अखेर लक्ष्य सेनने 21 - 16 असा सामना जिंकत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT