IND vs ENG Test KS Bharat  esakal
क्रीडा

IND vs ENG Test : कामगिरी केली नाही तर नारळ मिळणार; संघातील या खेळाडूसाठी असेल शेवटची संधी?

अनिरुद्ध संकपाळ

IND vs ENG Test KS Bharat : भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. मालिकेतील पहिला सामना हा हैदराबाद येथे 25 जानेवारीपासून सुरू होईल. या मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. भारतीय संघाने दोन विकेटकिपर्सना स्थान दिले आहे. संघात केएल राहुल असून देखील केसी भरत आणि ध्रुव जुरेल यांची निवड करण्यात आली आहे.

केएल राहुल या मालिकेत विकेटकिपिंग करणार नाहीये. त्यामुळे केसी भरत हा भारताचा विकेटकिपर असणार आहे. तर युवा ध्रुव जुरेल हा त्याचा बॅकअप म्हणून संघात असेल. जरी केसी भरतचे प्लेईंग 11 मधील स्थान पक्के असले तरी इंग्लंडविरूद्धची कसोटी मालिका ही केसी भरतसाठी शेवटची संधी असेल. जर या मालिकेत त्याने विकेटकिपिंगसोबतच फलंदाजीतही योगदान दिलं नाही तर त्याला संघातून डच्चू देखील मिळू शकतो.

केसी भरतकडे चांगली कामगिरी करून संघातील स्थान टिकवण्यासाठी फक्त 2 कसोटी सामने असतील. जर तो फेल गेला तर भारतीय संघ पुन्हा केएल राहुलकडे वळू शकतो. ध्रुव जुरेलला इंग्लंडविरूद्धच्या महत्वाच्या मालिकेत संधी मिळेल याची शक्यता थोडी कमी आहे.

त्यामुळे आंध्र प्रदेशच्या 30 वर्षाच्या केसी भरतसाठी परिस्थिती करो या मरोची असणार आहे. भरतला 13 कसोटी मालिकेत बेंचवर बसल्यानंतर प्लेईंग 11 मध्ये खेळण्याची संधी मिळाली होती. ज्यावेळी ऋषभ पंत आणि केएल राहुल दुखापतग्रस्त होते त्यावेळी केसी भरतला संधी मिळाली होती.

केसी भरतने शेवटचा सामना जून 2023 WTC फायनलमध्ये खेळला. तो देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत आणि भारत अ संघाकडून खेळताना चांगली कामगिरी करतोय. मात्र त्याच्यासमोर भारत आणि इंग्लंडविरूद्धच्या मालिकेत चमकदार कामगिरी करण्याचं आव्हान असणार आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्मशानभूमीतील कपड्यांचा थाटला नवा घाणेरडा व्यवसाय, अहमदाबादला पोहोचत होते ‘ब्रँड न्यू’ बनून

IPL 2026: लखनौचा संघ चेन्नईलाही धक्का देणार?; ऋतुराज गायकवाडच्या संघासाठी प्लेऑफकरिता विजय आवश्यक, पहा कशी असेल Playing 11

Arzan Khambatta Sculptures : अरझान खंबाट्टा: शाळेत ड्रॉईंगमध्ये नापास होणारा मुलगा 'असा' बनला देशाचा प्रसिद्ध शिल्पकार

असं काय घडलेलं की, दिग्दर्शकांच्या पत्नीनं थेट उर्मिलाला मारलेली कानशिलात? अभिनेत्रीच्या एका चुकीमुळे बॉलिवूडने फिरवली पाठ?

Gold Price Drop in May : मे महिन्यात सोने स्वस्त, लग्नसराईत दिलासा!; ५ महिन्यात सोन्यात तब्बल ४० हजारांची घसरण

SCROLL FOR NEXT