Gold Medal Winning lawn Ball Indian Women Team Commonwealth Games 2022 At Birmingham esakal
क्रीडा

Commonwealth Games 2022 : लॉन बॉल्स महिला संघाने इतिहास रचला; सुवर्ण पदकाला गवसणी

अनिरुद्ध संकपाळ

Commonwealth Games 2022 : भारतीय महिला (4) लॉन बॉल्स संघाने इतिहास रचला. लॉन बॉल्समध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक (Gold Medal) जिंकणारा पहिला भारतीय संघ ठरला. दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या अंतिम सामन्यात भारताने 17 - 10 ने सामना जिंकत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. भारतीय लॉन बॉल संघात (lawn Ball Indian Women Team) लव्हली चौबे, पिंकी, नयनमोनी सौकिया आणि रूपा राणी तिर्की यांचा समावेश आहे. रूपा राणी तिर्की ही संघाची कर्णधार आहे. लॉन बॉल्समधील सुवर्ण पदकाबरोबरच भारताची राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्ण पदकांची संख्या 4 वर पोहचली आहे तर एकूण पदकांची संख्या दुहेरी आकड्याच म्हणजेच 10 वर पोहचली.

लॉन बॉल्स महिला (4) सुवर्ण पदकाच्या सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका 2 - 2 असा बरोबरीत होती. त्यानंतर भारतीय संघाने 4 - 2 अशी आघाडी घेतली. त्यानंतर आठव्या एंडनंतर दक्षिण आफ्रिकेवर 8-4 अशी आघाडी मिळवली. त्यानंतर मात्र दक्षिण आफ्रिकेने लॉन बॉल्स महिला (4) सुवर्ण पदकाच्या सामन्यात जबरदस्त कमबॅक केले. दक्षिण आफ्रिकेने भारताविरूद्धची 2 - 8 अशी पिछाडी भरून काढत दहाव्या एंडपर्यंत सामना 8 - 8 असा बरोबरीत आणला.

11 व्या एंडनंतर दक्षिण आफ्रिकेने भारतावर 10 - 8 अशी आघाडी घेतली. त्यानंतर 12 व्या एंडनंतर भारताने ही पिछाडी भरून काढत सामना 10 - 10 असा बरोबरीत आणला. भारताने 13 व्या एंडनंतर दक्षिण आफ्रिकेवर 12 - 10 अशी आघाडी मिळवली. त्यानंतर 14 व्या एंडनंतर भारताने ही आघाडी 15 - 10 अशी नेली. यानंतर 15 व्या आणि शेवटच्या एंडमध्ये भारतीय संघाने आपली आघाडी अजून दोन गुणांनी वाढवत सुवर्ण पदकावर मोहर उमटवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Muhurat Trading 2026: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शेअर बाजाराची सुट्टी असतानाही बाजार का उघडतो? काय आहे मुहूर्त ट्रेडिंगची परंपरा?

IND vs NZ 2nd ODI Live : आयना का बायना, जिंकल्याशिवाय जाईना... भारताचा नाट्यमय विजय, पावसाने वाचवले; मालिकेत आघाडी, कोण ठरला मॅच विनर?

भगवंत मान यांना व्हिसा देण्यास पाकिस्तान तयार; पण भारत सरकार परवानगी देणार का?

IND vs NZ 2nd ODI Live : धो धो पाऊस सुरू झाला... भारताच्या झाल्यात ७ बाद ११३ धावा; सामना आता रद्द झाला तर जिंकणार कोण?

Sakal Lit Fest 2026: ‘सकाळ लिट फेस्ट’ १२ नोव्हेंबरपासून;बुकर विजेत्या बानू मुश्ताक यांच्या हस्ते उद्‍घाटन

SCROLL FOR NEXT