Legend Cricket League Yusuf Pathan hit 80 runs
Legend Cricket League Yusuf Pathan hit 80 runs ESAKAL
क्रीडा

LCL : मिसबाहच्या एशियन लायन्सला 'पठाणी' दणका

अनिरुद्ध संकपाळ

अल अमेरात : लेजंड क्रिकेट लीगच्या (Legend Cricket League) सलामीच्याच सामन्यात इंडिया महाराजाने (India Maharaja) एशियन लायन्सचा (Asian Lions) पराभव करत विजयी सलामी दिली. कर्णधार विरेंद्र सेहवागच्या अनुपस्थितीत खेळल्या गेलेल्या या सामन्यात इंडिया महाराजाने एशियन लायन्सचा ७ विकेट्सनी पराभव केला. इंडिया महाराजाकडून युसूफ पठाणने (Yusuf Pathan) आपला पठाणी दणका दाखवून देत ४० चेंडूत ८० धावा ठोकल्या. तर कर्णधार मोहम्मद कैफने ३७ चेंडूत ४२ धावांची खेळी केली. (Legend Cricket League Yusuf Pathan hit 80 runs India Maharaja Won 1st Match Against Asian Lions)

एशियन लायन्सने प्रथम फलंदाजी करत इंडिया महाराजासमोर १७६ धावांचे आव्हान ठेवले होते. (India Maharaja vs Asian Lions) हे आव्हान पार करताना इंडिया महाराजाने स्टुअर्ट बिन्नी आणि एस बदरीनाथ या दोन फलंदाजांना लवकर गमावले. त्यानंतर नमन ओझाने १९ चेंडूत २० धावांची खेळी केली खरी पण, तो बाद झाल्याने इंडिया महाराजाची अवस्था ३ बाद ३४ अशी झाली. त्यानंतर मोहम्मद कैफ आणि युसूफ पठाण या जोडीने इंडिया महाराजाचा डाव सावरला.

मोहम्मद कैफ (Mohammed Kaif) सावध खेळत होता तर युसूफ पठाणने आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली. या दोघांनी ६३ चेंडूत ११६ धावांची भागीदारी रचली. यामुळे इंडिया महाराजाचा विजय निश्चित झाला. युसूफ पठाणने आपली ८० धावांची खेळी ५ षटकार आणि ९ चौकार मारून सजवली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने जिंकला टॉस; गुजरातच्या प्लेइंग-11 मध्ये मोठे बदल

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

SCROLL FOR NEXT