diago maradona
diago maradona 
क्रीडा

दिग्गज फूटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा

ब्युनॉस आयर्स - अर्जेंटिनाचा दिग्गज फूटबॉलपटू दिएगो मेराडोना यांचे वयाच्या 60 वर्षी कार्डिएक अटॅकने निधन झाले. डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार मॅराडोना यांना दोन आठवड्यांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. त्याआधी त्यांच्यावर सर्जरी करून मेंदूतील गाठ काढली होती.

मॅराडोना यांच्यावत तीन नोव्हेंबरला मेंदुची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रिया यशस्वी झाली होती आणि त्यातून प्रकृती सुधारत असल्याची माहिती डॉक्टरांनी सांगितले होते. मात्र पूर्ण बरे होण्यास वेळ लागेल असंही म्हटलं होतं. 

1986 च्या वर्ल्ड कप चॅम्पियन संघातील खेळाडू मॅराडोना हे जगप्रसिद्ध फूटबॉलपटू होते. जगातील दिग्गज फूटबॉलपटूंमध्ये त्यांचे नाव वरच्या क्रमांकावर आहे. मॅराडोना बोका ज्यूनिअर्स, नेपोली आणि बार्सिलोना याशिवाय इतर क्लबकडूनही खेळले होते. इंग्लंडविरुद्ध 1986 च्या स्पर्धेतील हँड ऑफ गॉडसाठी मॅराडोनाची खास ओळख होती. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT