क्रीडा

Lionel Messi : आता निवृत्त व्हा! गोलपोस्ट तशी रिकामीच होती तरी मेस्सीला करता आली नाही गोल, Video व्हायरल

Lionel Messi Copa America : कोपा अमेरिका स्पर्धेत अर्जेंटिनाने आपली मोहीम कॅनडाविरूद्धच्या सामन्याने सुरू केली.

अनिरुद्ध संकपाळ

Lionel Messi Copa America 2024 : अर्जेंटिनाने कोपा अमेरिका 2024 फुटबॉल स्पर्धेत अर्जेंटिनाने आज आपली मोहीम कॅनडाविरूद्ध सुरू केली. विश्वविजेत्या अर्जेंटिनाने कॅनडाला 2 - 0 अशी मात दिली. या दोन्ही गोलमध्ये लिओनेल मेस्सीने महत्वाची भुमिका बजावली. मात्र तरी देखील मेस्सीला पहिल्याच सामन्यात ट्रोलिंगला सामोरे जावे लागले. लिओनेल मेस्सीला सामन्याचा पहिला गोल करण्याची एक उत्तम संधी होती. मात्र ही साधी संधी मेस्सीला साधता आली नाही.

सध्या सोशल मीडियावर मेस्सीचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत अर्जेंटिनाचा गोलकिपर मार्टिनेझने थेट मेस्सीकडे पास दिला होता. मेस्सीसाठी सगळं मैदान रिकामं होतं. फक्त कॅनडाचा गोलकिपर आणि एक डिफेंडर या दोघांनीच प्रतिकार केला.

मात्र स्टार मेस्सीला या दोघांनाही चकवण्यात यश आलं नाही. त्याने गोल करण्याची सुवर्ण संधी दवडली. मेस्सीने पहिला प्रयत्न केला त्यावेळी तो शॉट थेट गोलकिपर मॅक्सिमला लागला. बॉल रिबाऊंड होऊन मेस्सीकडे आला. मेस्सीने यावेळी गोल किपरला चकवलं मात्र डिफेंडरने मेस्सीचा शॉट अडवला.

अर्जेंटिनाला पहिल्या हाफमध्ये गोल करण्यात यश आलं नाही. मात्र त्यानंतर जुलियन अलवारेझने अर्जेंटिनाचे खाते उघडले. त्याने एलेक्सिस मॅक अॅलिस्टरच्या पासवर गोल केला. त्यानंतर 65 व्या मिनिटाला मेस्सीने गोल करण्याची सुवर्णसंधी दवडली. अखेर लाऊटारो मार्टिनेझने 88 व्या मिनिटाला गोल करत अर्जेंटिनाची आघाडी 2 - 0 ने वाढवली. यावेळी मेस्सीने थ्रोबॉलद्वारे मार्टिनेझला पास दिला होता.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Kur Talathi assault case: पीक पाहणीच्या कारणावरून तलाठ्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला; शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

Umbartha Vastu Shastra: उंबरठ्यावर हळदीचं लेपन का करतात? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या यामागचं कारण

SCROLL FOR NEXT