Lionel Messi Retirement esakal
क्रीडा

Lionel Messi : अंत जवळ आलाय... मेस्सी अर्जेंटिनाने फायनल गाठल्यावर काय म्हणाला?

अनिरुद्ध संकपाळ

Lionel Messi Retirement : फिफा वर्ल्डकप 2022 च्या पहिल्या सेमी फायनल सामन्यात अर्जेंटिनाने झुंजार क्रोएशियाचा 3 - 0 असा पराभव केला. अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीचा हा शेवटचा वर्ल्डकप असल्याचे बोलले जात आहे. या शेवटच्या वर्ल्डकपमध्ये अर्जेंटिना अंतिम फेरीत पोहचली. यानंतर मेस्सीने अर्जेंटिनाच्या वृत्त संस्थेशी बोलताना आपल्या निवृत्तीबाबत एक मोठे वक्तव्य केले.

स्टार फुटबॉलर लिओनेल मेस्सीने 34 व्या मिनिटाला पेनाल्टीवर गोल करत अर्जेंटिनाला खाते उघडून दिले होते. मेस्सीचा हा यंदाच्या वर्ल्डकपमधील पाचवा गोल होता. मेस्सीने एक फुटबॉलपटू म्हणून सर्व काही साध्य केलं आहे. मात्र त्याच्या शिरपेचात आता फक्त वर्ल्डकप ट्रॉफीचा तुरा खोवणे बाकी आहे. 2014 मध्ये अर्जेंटिना फायनलमध्ये पोहचली होती. मात्र मेस्सीचे स्वप्न थोडक्यात हुकले. आता 2022 मध्ये पुन्हा एकदा मेस्सीच्या अर्जेंटिनाने अंतिम फेरी गाठली.

फायनल गाठल्यानंतर 35 वर्षाचा मेस्सी पत्रकारांशी बोलताना म्हणाला की, 'माझा वर्ल्डकपमधील प्रवास हा फायनल खेळून संपणार आहे याबाबत मी खूप खूष आहे. पुढचा वर्ल्डकप खूप वर्षांनी होणार आहे. मला नाही वाटत की मी पुढचा वर्ल्डकप खेळू शकेन. माझा वर्ल्डकपमधील प्रवास हा उत्तमरित्या संपणार आहे.'

मेस्सी वैयक्तिक रेकॉर्डबद्दल बोलताना म्हणाला की, 'रेकॉर्ड्स खूप चांगले आहेत मात्र सांघिक उद्दिष्ट साध्य करणे हे त्यापेक्षाही महत्वाचे आहे. आमच्या दृष्टीने ही सर्वात सुंदर गोष्ट आहे. आम्ही फक्त एक पाऊल मागे आहोत. आम्ही सर्वस्व पणाला लावून लढलो आहे. यावेळी वर्ल्डकप जिंकण्यासाठी आम्ही सर्व काही पणाला लावू.'

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT