lok sabha election 2024 yuvraj singh joins bjp latest marathi news
lok sabha election 2024 yuvraj singh joins bjp latest marathi news sakal
क्रीडा

Yuvraj SIngh Lok Sabha 2024 : युवराज करणार भाजपमध्ये प्रवेश, गडकरींनी दिली 'या' मतदारसंघाची ऑफर? चर्चांना उधाण

Kiran Mahanavar

Lok Sabha Election 2024 Yuvraj Singh Joins BJP : टीम इंडियाचा सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक म्हणजे युवराज सिंग. ज्याने 2007 आणि 2011 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाला चॅम्पियन बनवण्यात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली. आता बातमी येत आहे की, 22 यार्डच्या खेळपट्टीवर 6 चेंडूत 6 षटकार ठोकणारा युवराज सिंग राजकीय खेळपट्टीवर भाजप पक्षासोबत नवी इनिंग सुरू करणार आहे.

युवराज सिंग आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. पंजाबमधील गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघातून तो निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. बॉलीवूड अभिनेता सनी देओल सध्या गुरुदासपूरमधून भाजपचा खासदार आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नुकत्याच झालेल्या भेटीनंतर युवराज राजकारणात प्रवेश करणार या चर्चांना उधाण आलं आहे. गडकरी यांनी शुक्रवारी (9 फेब्रुवारी) युवराज आणि त्यांची आई शबनम सिंग यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. त्यांच्या या भेटीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. 2019 मध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या युवराजने कधीही राजकारणात येण्याची इच्छा व्यक्त केलेली नाही.

काही वृत्तसंस्थांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, आगामी निवडणुकीत युवराजला गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे आणि सनी देओलनंतर तो या मतदारसंघात भाजपचा चेहरा बनू शकतो. जर हे खरे असेल तर, युवराज राजकारणात प्रवेश करणाऱ्या गौतम गंभीर आणि हरभजन सिंग यांच्या यादीत सामील होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT