Virat Kohli  Sakal
क्रीडा

Lookback 2021: कोहलीसाठी वर्ष ठरलं 'पणौती'

सुशांत जाधव

Lookback 2021, Virat Kohli Record : भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यंदाचे वर्ष संघर्षमयी राहिले. यावर्षीही त्याच्या भात्यातून एकही शतक पाहायला मिळाले नाही. त्याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने टी-20 वर्ल्ड कपमध्ये खराब कामगिरी केली. एवढेच नाही तर पहिली वहिली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकण्याची संधीही त्याने गमावली.

सेंच्युरियनच्या मैदानात भारत आणि दक्षिण आफ्रिका ( India vs South Africa) यांच्यात सामना सुरु आहे. या वर्षातील भारतीय संघाचा हा शेवटचा सामना आहे. पहिल्या डावात 35 धावा केल्यानंतर दुसऱ्या डावात तरी कोहलीची बॅट तळपणार का? याकडे क्रीडा प्रेमींचे लक्ष्य होते. पण कोहलीने पुन्हा निराश केले. दुसऱ्या डावात त्याने जर्सी मागे असलेल्या नंबर एवढ्या 18 धावाच केल्या. विराट कोहलीने 2019 मध्ये बांगालदेश विरुद्ध अखेरचं शतक झळकावले आहे. तेव्हापासून त्याला नावाला साजेसा खेळ करता आलेला नाही.

विराट कोहलीसाठी (Virat Kohli) हे वर्ष (2021 Year) खूपच वाईट गेले. याच वर्षी त्याने टी-20 संघाचं नेतृत्व सोडले. त्यानंतर त्याला वनडे संघाच्या नेतृत्वही गमवावे लागले. यावर्षी मार्च 2021 मध्ये भारतीय संघाने इंग्लंड विरुद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका खेळली. या मालिकेत कोहलीने 115.50 च्या सरासरीसह 147.13 च्या स्ट्राइक रेटनं 231 धावा केल्या. यात त्याने तीन अर्धशतके झळकावली.

टी-20 वर्ल्ड कपमध्ये खराब कामगिरी

टी-20 वर्ल्ड कप 2021 च्या स्पर्धेत विराट कोहलीने पाच सामन्यातील तीन डावात 34 च्या सरासरीने 68 धावा केल्या. टी20 वर्ल्डकप (T20 Worldcup) मधील पाकिस्तान विरुद्धच्या सलामीच्या सामन्यात 49 चेंडूत 57 धावा केल्या. न्यूझीलंड विरुद्ध 17 चेंडूत 9 धावा केल्या होत्या. स्कॉटलंड विरुद्धच्या सामन्यात कोहलीने 2 चेंडूत नाबाद 2 धावांची खेळी केली होती. अफगाणिस्तान आणि नामिबिया विरुद्ध त्याच्यावर बॅटिंगची वेळच आली नव्हती.

वनडेत विराटची कामगिरी

विराट कोहलीने या वर्षात केवळ तीन वनडे सामने खेळले. पुण्यात झालेल्या तीन सामन्यात मिळून कोहलीने 129 धावा केल्या होत्या. जुलैमध्ये इंग्लंड दौऱ्यावर असल्यामुळे त्याला श्रीलंका दौऱ्याला मुकावे लागले.

विराटची कसोटीतील कामगिरी

या वर्षात विराट कोहलीने 11 कसोटी सामन्यात 19 वेळा बॅटिंग केली. यात त्याने 28.21 च्या सरासरीसह 44.07 च्या स्ट्राइक रेटनं 536 धावा केल्या. चार अर्धशतकामध्ये त्याची 72 ही सर्वोच्च धावसंख्या राहिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Alert : कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट ! हवामान खात्याचा मोठा इशारा, जाणून घ्या राज्यात आज कसे असेल हवामान?

Krishna Sugar Factory: कृष्णा कारखान्यासाठी आजपासुन धुमशान; उमेदवारी अर्ज आजपासुन २२ मे पर्यंत दाखल करता येणार, भोसले विरुद्ध मोहिते पुन्हा संघर्ष..

Satara Politics: सातारा पालिकेतील वादावर शिवेंद्रसिंहराजेंचा दणका; उदयनराजेंनंतर शिवेंद्रसिंहराजेंचीही बैठक, 'निवडून आणलं, पाडूही शकतो'..

मोठी बातमी! ग्रामीणमधील नववी-दहावीच्या 20 विद्यार्थ्यांसाठी 3 शिक्षक; शहरांमधील 300 शाळांना लावावे लागणार कुलूप; प्रत्येक वर्गात 20 पटसंख्येची अट

Panchang 18 May 2026 : पंचांग! शुभ मुहूर्त, राहुकाळ, चंद्रदर्शन आणि सर्वार्थसिद्धी योग माहिती

SCROLL FOR NEXT