Wimbledon 2024 Sakal
क्रीडा

Wimbledon 2024 : विम्बल्डन टेनिस ग्रँडस्लॅम उपांत्य फेरीत जोकोविचच्या मार्गात लोरेंझोचा अडथळा

मार्गारेट कोर्ट यांच्यासह सर्वाधिक ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावण्याचा विक्रम नावावर असलेल्या नोवाक जोकोविचसमोर उद्या (ता. १२) होत असलेल्या विम्बल्डन टेनिस ग्रँडस्लॅमच्या उपांत्य फेरीत लोरेंझो मुसेटीचे आव्हान असणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

लंडन : मार्गारेट कोर्ट यांच्यासह सर्वाधिक ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावण्याचा विक्रम नावावर असलेल्या नोवाक जोकोविचसमोर उद्या (ता. १२) होत असलेल्या विम्बल्डन टेनिस ग्रँडस्लॅमच्या उपांत्य फेरीत लोरेंझो मुसेटीचे आव्हान असणार आहे.

नोवाक जोकोविच याने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीसाठी टेनिसकोर्टवर न उतरताच उपांत्य फेरीत प्रवेश केला. ॲलेक्स दी मिनॉर याने दुखापतीमुळे माघार घेतल्यामुळे जोकोविचला उपांत्य फेरीत पाऊल ठेवता आले. लोरेंझो मुसेटी याने टेलर फ्रिट्‌झ याचे कडवे आव्हान पाच सेटमध्ये परतवून लावत अंतिम फेरीत वाटचाल केली. मुसेटी याने फ्रिट्‌झ याच्यावर ३-६, ७-६, ६-२, ३-६, ६-१ असा विजय मिळवला.

पारडे सर्बियन खेळाडूच्या बाजूने

जोकोविच-लोरेंझो मुसेटी यांच्यामध्ये आतापर्यंत सहा लढती पार पडलेल्या आहेत. त्यापैकी पाच लढतींमध्ये जोकोविचने विजय संपादन केले आहेत. यंदा फ्रेंच ओपन स्पर्धेत हे दोन्ही खेळाडू एकमेकांसमोर आले होते. जोकोविचने पाच सेटच्या झुंजीनंतर विजय मिळवला होता. या लढतीनंतरच जोकोविचला दुखापत झाली होती. सर्बियाच्या नोवाक जोकोविचचे पारडे या वेळी जड आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

यशचा डबल रोल, दमदार अ‍ॅक्शन अन् जबरदस्त स्टाईल; ‘Toxic’ किती भावला? पण ३ तास १४ मिनिटांचा सिनेमा करतो बोअर!

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

US H1B Visa: अमेरिकेचा H1B झटका! १ लाख ३ हजार डॉलर अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती

SCROLL FOR NEXT