World Women's Boxing Championship 
क्रीडा

Boxing Championships : जागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धेत साक्षी, लवलिना उपांत्यपूर्व फेरीत

सकाळ ऑनलाईन टीम

World Women's Boxing Championship : आशियाई ब्राँझपदक विजेती साक्षी चौधरी व टोकियो ऑलिंपिक ब्राँझपदक विजेती लवलिना बोगहिन या भारताच्या दोन महिला खेळाडूंनी जागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धेमध्ये आपआपल्या गटात प्रतिस्पर्थ्यांना जोरदार ठोसे मारत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. भारताच्या प्रीती हिचे आव्हान मात्र सोमवारीच संपुष्टात आले.

२३ वर्षीय साक्षी हिने ५२ किलो वजनी गटात कझाकस्तानच्या झाझीरा उरकबायेवा हिच्यावर ५-० असा दणदणीत विजय मिळवला. हरयानाच्या साक्षीसमोर कझाकस्तानच्या खेळाडूचा निभाव लागला नाही. साक्षीने आक्रमक खेळ करीत या लढतीत सहज विजय मिळवला हे विशेष. लवलिना हिने मेक्सिकोच्या वेनिसा ओटींझ हिला ५-० असे नमवले. लवलिना हिने ७५ किलो वजनी गटात प्रतिस्पर्धी खेळाडूला अगदी सहज हरवले.

लवलिना व वेनिसा यांच्यामधील लढत एकतर्फी झाली. साक्षी व लवलिना यांनी अंतिम आठमध्ये प्रवेश केला. मात्र प्रीती हिला थायलंडच्या जितपोंग जुतामस हिच्याकडून ४-३ असे पराभूत व्हावे लागले. प्रीती हिने ५४ किलो वजनी गटात कडवी झुंज दिली. पण तिला विजय मिळवता आला नाही. रिव्यूनंतर या लढतीचा निकाल लावण्यात आला. सहा खेळाडू आज लढणार भारताच्या सहा महिला खेळाडूंच्या लढती उद्या होणार आहेत.

नीतू ४८ किलो वजनी गटात, तर मनीषा ५७ किलो वजनी गटात लढेल. शशी चोप्रा ६३ किलो वजनी गटात सर्वस्व पणाला लावेल. निखत झरीन ५२ किलो वजनी गटात आणि जास्मिन लॅम्बोरिया ६० किलो वजनी गटात प्रतिस्पर्ध्याना टक्कर देईल. मंजू बाम्बोरिया ६६ किलो वजनी गटात सहभागी होईल. भारतीय खेळाडूंच्या सहाही लढती उपउपांत्यपूर्व फेरीच्या लढती असणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BEST Bus: रक्षाबंधनसाठी 'बेस्ट'ची मोठी भेट, १३६ जादा गाड्या चालवण्याचे नियोजन

Nashik Shalarth Scam: शालार्थ घोटाळ्याची ‘कागदपत्रे’ पोलिसांच्या रडारवर; ८२१ शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या प्रस्तावांची शहानिशा

Sindhudurg Elephant Attack: ओंकार हत्ती आक्रमक पळताना शेतकरी जखमी, फोंडयेत मोटारीची नासधूस

Marathi News Live Updates : एका सक्षम पथकाची नियुक्ती केली आहे आणि सखोल चौकशी सुरू आहे - अहिर

Gadchiroli News: विमानतळ आणि MIDC साठी जमीन संपादनाला विरोध; गडचिरोलीतील शेतकऱ्यांनी मनसेकडे मांडली व्यथा

SCROLL FOR NEXT