Lucknow Super Giants Captain KL Rahul eye On Three South African Player In IPL 2022 Auction  esakal
क्रीडा

IPL 2022 : लखनौच्या राहुलचा 'या' आफ्रिकी खेळाडूंवर डोळा

अनिरुद्ध संकपाळ

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिका दौरा संपतो ना संपतो तोच भारतात आयपीएलच्या १५ (IPL 2022) व्या हंगामाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. आयपीएल २०२२ साठी येत्या फेब्रुवारी महिन्यात १२ आणि १३ तारखेला मेगा ऑक्शन (IPL Mega Auction) होणार आहे. विशेष म्हणजे यंदाच्या हंगामापासून आयपीएलमध्ये ८ नाही तर १० संघ असणार आहेत. लखनौ सुपर जायंट (Lucknow Super Giants) आणि अहमदाबाद या दोन नव्या संघाचा समावेश होणार आहे. लखनौ सुपर जायंटचे नेतृत्व केएल राहुल (KL Rahul) करणार आहे. नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर राहुलने एका कसोटीत आणि तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. यात दरम्यान, राहुलने आपल्या लखनौ संघासाठी काही दक्षिण आफ्रिकी खेळाडू देखील हेरून ठेवले. (Lucknow Super Giants Captain KL Rahul eye On Three South African Player In IPL 2022 Auction)

लखनौ सुपर जायंटचा कर्णधार केएल राहुलने दक्षिण आफ्रिकेच्या कसिगो रबाडाचे (Kagiso Rabada) तोंडभरून कौतुक केले आहे. रबाडा सारखा गोलंदाज आपल्या संघात असावा असे कोणत्याही संघाला वाटेल. आयपीएलमध्ये दिल्लीसाठी रबाडाने चांगली कामगिरी केली होती. तो १४५ किमी वेगाने गोलंदाजी करतो आणि स्मार्ट गोलंदाज आहे.'

याच बरोबर केएल राहुलने २१ वर्षाच्या मार्को जानसेन (Marco Jansen) आणि रासी वॅन डुसेन (Rassie van der Dussen) यांचेही कौतुक केले. कसोटी मालिकेदरम्यान आम्ही जानसेनबद्दल ड्रेसिंग रूममध्ये चर्चा केल्याचे राहुलने सांगितले. तो म्हणाला की, 'जानसेनने आयपीएलमध्ये (Indian Premier League) मुंबईसाठी काही सामने खेळले आहेत. आता त्यांची गुणवत्ता दिसून येत आहे. कसोटी मालिकेत केलेल्या कामगिरीनंतर त्याच्याबद्दलचा लोकांचा दृष्टीकोण बदलला आहे. आगामी काळात तो आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करताना दिसेल.'

लखनौचा कर्णधार (Lucknow Captain) केएल राहुलच्या बोलण्यावरून या तीन दक्षिण आफ्रिकी खेळाडूंबद्दल तो उत्सुक असल्याचे दिसते. त्यामुळे लखनौ सुपर जायंट आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये या तीन खेळाडूंवर बोली लावण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाल समुद्रात दहशत! जीव वाचवण्यासाठी जहाजांच्या रडारवर मुस्लिम असल्याचे मेसेज; धर्म विचारुन केलं जातंय लक्ष्य

Amazon Prime Day Sale: आला रे आला अमेझॉनचा ‘प्राइम डे सेल’ आला; मध्यरात्रीच सुरू होतोय धडका, मोठी संधी चुकवू नका!

Latest Marathi News Updates: पुणे स्लीपर सेल मॉड्युल प्रकरणी अकरावी अटक

Shambhuraj Desai : मंत्री शंभुराज देसाईंचे थेट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनाच आव्हान... म्हणाले,

IND vs ENG 3rd Test: जसप्रीत बुमराहच्या ५ विकेट्सने दिले हादरे! कपिल देवसह अनेकांचे विक्रम मोडले; पण इंग्लंडचे शेपूट पुन्हा वळवळले

SCROLL FOR NEXT