Madhya Pradesh has made history by winning the final of Ranji Trophy 2021-22 Madhya Pradesh vs Mumbai kgm00 
क्रीडा

Ranji Trophy Final : मध्य प्रदेशने मुंबईला हरवून रचला इतिहास

मध्य प्रदेशने मुंबईचा रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामना सहा गडी राखून पराभव केला

Kiran Mahanavar

Ranji Trophy Final : बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर मध्य प्रदेश आणि मुंबई यांच्यातील रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामना खेळला गेला. रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात मध्य प्रदेशने 41 वेळच्या चॅम्पियन मुंबईचा 6 गडी राखून पराभव करून पहिल्यांदाच विजेतेपद पटकावले. शेवटच्या दिवशी मुंबईने मध्य प्रदेशसमोर विजयासाठी 108 धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे संघाने 29.5 षटकांत पूर्ण केले. मध्य प्रदेशच्या या विजयाचे नायक यश दुबे, शुभम शर्मा आणि रजत पाटीदार होते, ज्यांनी संघाला पहिल्या डावात शतकी आघाडी मिळवून दिली. या पदवीने मध्य प्रदेशने 67 वर्षांचा दुष्काळ संपवला आहे. (Madhya Pradesh has made history by winning the final of Ranji Trophy 2021-22)

मुंबईच्या पहिल्या डावात सर्फराज खानने शतकाच्या जोरावर 374 धावा केल्या. मध्य प्रदेशने पहिल्या डावात 162 धावांची आघाडी घेत 536 धावा फलकावर लावत आणि त्याचवेळी सामन्यावर कब्जा केला. मध्य प्रदेशकडून यश दुबे, शुभम शर्मा आणि रजत पाटीदार यांनी शतके झळकावली. पहिल्या डावात पिछाडीवर पडल्याने मुंबईचा संघ तुटला होता. दुसऱ्या डावात वेगवान धावसंख्येच्या प्रयत्नात मुंबईचा संपूर्ण संघ 269 धावांत गारद झाला. कुमार कार्तिकेयने ४ बळी घेत मुंबईचे कंबरडे मोडले. 108 धावांचे लक्ष्य एमपीने 30व्या षटकाच्या एका चेंडूवर सहज पार केले. यादरम्यान हिमांशूने 37 तर शुभम आणि पाटीदारने 30-30 धावा केल्या. पाटीदारने विजयी शॉट मारला आणि तो शेवटपर्यंत नाबाद राहिला.

रणजी ट्रॉफी 2021-22 च्या पहिल्या उपांत्य फेरीत मध्य प्रदेशने बंगाल संघाचा 174 धावांनी पराभव केला. मध्य प्रदेशचा संघ दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला होता. याआधी 1998-99 मध्ये मध्य-प्रदेशने केवळ एकदाच स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. कर्नाटकविरुद्धच्या सामन्यात त्याने सुरुवात चांगली केली आणि पहिल्या डावातही आघाडी घेतली. असे असतानाही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Silver Price Today: फक्त 'या' कारणांमुळे सोन्याचे भाव कोसळले; आज काय आहे 24 कॅरेचा भाव?

Monsoon Kitchen Care: पावसाळ्यात स्वयंपाकघरातील दमटपणा कमी करायचाय? मग 'या' गोष्टी नक्की करा

Khadakwasla Dam: 1961 चा महापूर… पण खडकवासला धरण वाचलं कसं? अज्ञात इतिहास वाचा

Rain-Maharashtra Latest live news update: NDA कडून सीपी राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपतीचा अर्ज भरला

Asia Cup 2025 Explainer : श्रेयस अय्यरने आणखी काय करायला हवं? आगरकर म्हणाला, ना त्याची चूक, ना आमची...; मग दोष कुणाचा?

SCROLL FOR NEXT