madras high court chess olympiad 2022 direction to state to include photograph of-prime minister and president in advertisements SAKAL
क्रीडा

Chess Olympiad 2022 : बुद्धिबळ ऑलिंपियाडप्रकरणी मद्रास उच्च न्यायालयाची नाराजी

मुद्रित व इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या या स्पर्धेच्या जाहिरातींमध्ये पंतप्रधान व राष्ट्रपती यांची छायाचित्रे योग्य प्रकारे प्रसिद्ध करावीत

सकाळ वृत्तसेवा

चेन्नई : तमिळनाडूतीस मामल्लपुरम येथे सुरू झालेलल्या बुद्धिबळ ऑलिंपियाड २०२२ या स्पर्धेच्या जाहिरातींमध्ये पंतप्रधान आणि राष्ट्रपतींचे छायाचित्र नसल्याने मद्रास उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले. मुद्रित व इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या या स्पर्धेच्या जाहिरातींमध्ये पंतप्रधान व राष्ट्रपती यांची छायाचित्रे योग्य प्रकारे प्रसिद्ध करावीत, असा आदेशही दिला.

देशाच्या दोन सर्वोच्च पदांवरील व्यक्तींची छायाचित्र जाहिरातीत नाही, याचे तमिळनाडू सरकारने दिलेले स्पष्टीकरणही मुख्य न्यायधीश मुनीश्‍वर नाथ भंडारी व न्यायाधीश एस. अनंता यांच्या खंडपीठाने फेटाळले. जाहिरातीं तयार होईपर्यंत राष्ट्रपतिपदाची निवड झाली नव्हती आणि पंतप्रधानांच्या कार्यालयाकडून उशीरा परवानगी मिळाली, असे कारण तमिळनाडू सरकारने दिले होते. न्यायालयाने ते फेटाळले. प्रत्येक नागरिकाच्या मनात राष्ट्रहिताला कायम सर्वोच्च प्राधान्य हवे, असे खंडपीठाने सांगितले.

‘‘आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आपल्या देशात होत असताना राज्य सरकारसह प्रत्येक सरकारने त्यात सहभागी झाले पाहिजे आणि असे कार्यक्रमांचे नियोजन संपूर्ण क्षमतेने केले जाईल याची दक्षता घेणे हे प्रत्यकाचे कर्तव्य आहे. यातून आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर अमिट छाप सोडत असतो,’’ असे न्यायालय म्हणाले. मामल्लपुरम येथील ४४ बुद्धिबळ ऑलिपियाडच्या सर्व जाहिरांमध्ये मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचेच छायाचित्र प्रसिद्ध करणे अवैध व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन असल्याचे मदुराईचे रहिवासी राजेश कुमार यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : शेताच्या बांधावर अनवाणी धावणाऱ्या गुलवीर सिंगने राष्ट्रकुल स्पर्धेत इतिहास घडवला; ०.०४ सेकंदाच्या फरकाने जिंकले दुसरे पदक

Commonwealth Games 2026: ७ सुवर्ण, ३ रौप्य.. बॉक्सिंगपटूंची ऐतिहासिक कामगिरी; भारताची Medal Table मध्ये उत्तुंग भरारी, बघा कितव्या स्थानावर पोहोचले

Commonwealth Games 2026: सचिन... सचिन... पंचांनी १ गुण वजा केला, भारताचा बॉक्सर पेटला; तिसऱ्या फेरीत मुक्क्यांची बरसात करून जिंकले सुवर्ण...

Education Initiative: चिमुकल्या इरफानच्या आठवणीत अमळनेरमध्ये शिक्षणसेवेचा संकल्प; गरजू विद्यार्थ्यांना मोफत साहित्य वाटप उपक्रम

Commonwealth Games 2026: धक्कादायक... ऑलिम्पिक पदक विजेत्या लव्हलिना बोरगोहैनचे सुवर्ण हुकलं...

SCROLL FOR NEXT