Chess Olympiad 2022 esakal
क्रीडा

Chess Olympiad : जाहिरातींमध्ये राष्ट्रपती- PM यांचा फोटो वापरा- हायकोर्ट

बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या जाहिरातींमध्ये पंतप्रधान मोदींना स्थान द्यायला हवं होतं.

सकाळ डिजिटल टीम

बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या जाहिरातींमध्ये पंतप्रधान मोदींना स्थान द्यायला हवं होतं.

मदुराई : मद्रास उच्च न्यायालयाच्या (Madras High Court) मदुराई खंडपीठानं (Madurai Bench) तामिळनाडू सरकारला 44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडशी (Chess Olympiad 2022) संबंधित सर्व जाहिरातींमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची छायाचित्रं (फोटो) दिसतील याची खात्री करण्याचे आदेश दिलेत. राज्यात 28 जुलै ते 10 ऑगस्ट दरम्यान बुद्धिबळ ऑलिम्पियाड 2022 चं आयोजन करण्यात आलंय.

राष्ट्रपती आणि पंतप्रधानांची छायाचित्रं असलेल्या जाहिरातींमध्ये छेडछाड करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचेही आदेश उच्च न्यायालयाने दिलेत. शिवगंगई येथील रहिवासी राजेश कुमार यांनी मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठात याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाचा हा आदेश आलाय. मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठानं असंही म्हटलंय की, तामिळनाडूमध्ये होणाऱ्या 44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या जाहिरातींमध्ये पंतप्रधान मोदींना स्थान द्यायला हवं होतं, असंही त्यांनी स्पष्ट केलंय. कुमार यांनी आपल्या याचिकेत म्हटलंय की, 44 वे बुद्धिबळ ऑलिम्पियाड गुरुवारपासून चेन्नई, तामिळनाडू येथील मामल्लापुरम इथं सुरू होत आहे. या स्पर्धेचं उद्घाटन पंतप्रधान मोदी करणार आहेत.

28 जुलै ते 10 ऑगस्ट या कालावधीत होणार्‍या या स्पर्धेला मोठ्या प्रमाणात सार्वजनिक करातून निधी उपलब्ध करून देण्यात आला असून आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या देशाला अभिमान वाटावा अशी ही घटना आहे. मात्र, सत्ताधारी पक्षानं आपल्या राजकीय फायद्यासाठी दोन महत्वाच्या नेत्यांचा फोटो जाहिरातींमध्ये घेतला नाहीय. भारताचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या छायाचित्रांशिवाय या जाहिरातींमध्ये फक्त मुख्यमंत्री स्टॅलिन यांचा फोटो दिसत आहे, असंही याचिकेत म्हटलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT