IIT Madras Sports Quota ESAKAL
क्रीडा

IIT Madras Sports Quota : मद्रास आयआयटी ठरलं स्पोर्ट्स कोटा आरक्षित करणारं पहिलं IIT

अनिरुद्ध संकपाळ

IIT Madras Sports Quota : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास ही स्पोर्ट्स कोटी आरक्षित करणारी पहिली आयआयटी संस्था ठरली आहे. आयआयटी मद्रासने त्यांच्या अंडर ग्रॅज्युएट प्रवेशांसाठी हा स्पोर्ट्स कोटा आरक्षित केला आहे. त्यांनी प्रत्येक कोर्ससाठी दोन जागा सोर्ट्ससाठी आरक्षित ठेवल्या आहे. ही माहिती डायरेक्टर व्ही कामकोटी यांनी दिली.

सध्या, आयआयटीमध्ये कोणताही स्पोर्ट्स कोटा नाही. मात्र देशातील इतर विद्यापीठांमध्ये सोर्ट्स कोटा आहे.

याबाबत पीटीआयशी बोलताना कामकोटी यांनी सांगितलं की, 'शैक्षणिक वर्ष 2024- 25 पासून आम्ही आयआयटी मद्रासमध्ये अंडर ग्रॅज्युएट कोर्सेससाठी दोन जागा स्पोर्ट्ससाठी राखीव ठेवणार आहोत.'

'असा कोटा आरक्षित करणारे मद्रास आयआयटी ही पहिली आयआयटी संस्था आहे. यामागे क्रीडा क्षेत्रात एका विशिष्ट स्तरावर चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा उद्येश आहे.'

ते पुढे म्हणाले की, 'एसईए (Sports Excellence Admission) द्वारे दोन जागा राखीव ठेवल्या जातील. त्यातील एक जागा ही महिलांसाठी राखीव असेल.'

आयआयटी स्पोर्ट्स कोटासाठी कशी असेल पात्रता?

एसईएद्वारे आयआयटी मद्रासमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी उमेदवाराने कॉमन रँक लिस्टमध्ये किंवा जेईई अॅडव्हान्समध्ये श्रेणीनुसार रँक मिळवणे गरजेचे आहे. याचबरोबर त्याने राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर गेल्या चार वर्षात निदान एक पदक जिंकलेलं असावं.

याचबरोबर उमेदवाराने आयआयटी प्रवेशासाठी 12 वी मध्ये किमान आवश्यक असलेले गुण मिळवणे देखील गरजेचे आहे. याचबरोबर प्रवेशावेळी वेगळी स्पोर्ट्स रँक लिस्ट देखील प्रसिद्ध केली जाणार आहे. ही यादी विशिष्ट खेळात खेळाडूंनी केलेल्या कामगिरीद्वरे तयार केली जाईल. या यादीद्वारेच जागांचे वाटप होईल.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shendurwada News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रयत्न; दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार प्रशांत बंब यांचे आश्वासन

Karad News : साताऱ्यातील तालुक्यात दुष्काळ जाहीर होण्यासाठी शंभूराज देसाई यांची थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे धाव

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

SCROLL FOR NEXT