क्रीडा

महाराष्ट्रातील 30 जिल्ह्यात खेलो इंडियाची ३६ केंद्रे

नामदेव कुंभार

नवी दिल्ली : केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने देशातील सात राज्यांत १४३ समर्पित खेलो इंडिया केंद्रे सुरू करण्यास मंजुरी दिली असून, त्यासाठी १४.३० कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. या प्रत्येक केंद्रात एका क्रीडा प्रकाराचे प्रशिक्षण दिले जाईल. महाराष्ट्रासह, मिझोराम, गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूर येथे ही केंद्रे स्थापन केली जाणार आहेत, अशी माहिती केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली. (Maharashtra: 36 Khelo India Centres To Be Opened In 30 Districts)

महाराष्ट्रातील तीस जिल्ह्यांत ३६ खेलो इंडिया केंद्रे स्थापन केली जाणार असून, त्यासाठी ३.६० कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. मिझोराममध्ये २, अरुणाचल प्रदेशमध्ये ५२, मध्य प्रदेशात ४, कर्नाटकात ३१, मणिपूरमध्ये १६ आणि गोव्यात २ खेलो इंडिया केंद्रे सुरू केली जाणार आहेत. देशात तळागाळापर्यंतच्या खेळाडूंना उत्तम दर्जाचे क्रीडा साहित्य आणि सुविधा तसेच प्रशिक्षण मिळवून देण्याच्या हेतूने ही केंद्रे सुरू करण्यात आली. या क्रीडा उपक्रमांतून निष्णात खेळाडूंची निवड करू शकतो. क्रीडा मंत्रालयाने येत्या चार वर्षांत अशी एक हजारपेक्षा अधिक क्रीडा केंद्रे सुरू करण्याची योजना तयार केली आहे. आतापर्यंत २१७ क्रीडा केंद्रे स्थापन झाली असून, ईशान्य भारतातील राज्ये, जम्मू-कश्मीर, अंदमान निकोबार आणि लडाख या सर्व ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यात अशी प्रत्येकी दोन केंद्रे सुरू केली जाणार आहेत, असे रिजीजू यांनी स्पष्ट केले.

२०२८ च्या ऑलिंपिकमध्ये भारताला पहिल्या १० देशांमध्ये स्थान मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी लहान वयापासूनच क्रीडाकौशल्य असलेल्या मुलांची पारख करून त्यांना प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.

किरेन रिजिजू, क्रीडा मंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT