maharashtra Budget 2024 Ajit Pawar big announcement in sports Athletes asian games medal sakal
क्रीडा

Maharashtra Budget 2024 : आशियाई स्पर्धेत पदक जिंकणारे खेळाडू बनणार करोडपती! अजित पवारांची बजेटमध्ये मोठी घोषणा

Kiran Mahanavar

Maharashtra Budget 2024 : महाराष्ट्रात अनेक राजकीय घडामोडी सुरू असताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज पुढच्या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी अजित पवार यांनी आजच्या अर्थसंकल्पातून क्रीडा क्षेत्रामध्ये महाराष्ट्राची कामगिरी उंचावण्यासाठी मोठ्या घोषणा केल्या.

खेळाडूंसाठी 'मिशन लक्षवेध' योजनेअंतर्गत राज्य स्तरावर उच्च कामगिरी केंद्र, विभागीय स्तरावर क्रिडा उत्कृष्टता केंद्र, जिल्हा स्तरावर क्रिडा प्रतिभा विकास केंद्र अशी खेळाडंसाठी त्रिस्तरीय प्रशिक्षण यंत्रणा उभारण्यात येणार आहे.

यासोबत आशियाई स्पर्थेत ज्या खेळाडूंना सुवर्णपदक मिळाली आहे, त्यांना सरकार 1 कोटी देणार आहेत, तर रजतपदक जिंकणाऱ्या खेळाडू 75 लाख आणि कांस्यपदक विजेत्या खेळाडूंना 50 लाख रुपये बक्षिस देण्याची घोषणा यावेळी महाराष्ट्र विधिमंडळात आज उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी केली.

यासोबत अर्थमंत्री अजित पवार यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. ज्यामध्ये शेतकरी, कष्टकरी, महिला, विद्यार्थी, युवक, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक, उद्योजक, व्यापारी यांना विकासाची संधी देणारा हा अर्थसंकल्प असल्याचं अर्थमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Forecast : परतीचा मान्सून बरसणार! पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा अन् विदर्भात पावसाचा इशारा, आज २४ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Railway : हडपसर-हरंगूळ, नांदेड एक्स्प्रेसचे तीन डबे वाढणार

Beetroot Poriyal: खवलेले खोबरे अन् खमंग फोडणी; १० मिनिटांत बनवा दाक्षिणात्य पद्धतीची बीटरूट पोरियल! पाहा सोपी रेसिपी...

आजचे राशिभविष्य - 22 सप्टेंबर 2026

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT