Sharad Pawar Esakal
क्रीडा

Maharashtra Kesari: महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेच्या आयोजनावरून पवारांसमोर लांडगेंनी ठोकला शड्डू

महाराष्ट्र केसरीचा आखाडा कोण भरवणार यावरूनच आता कुस्ती संघटनांमध्ये वाद

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्र केसरीचा आखाडा कोण भरवणार यावरूनच आता कुस्ती संघटनांमध्ये वादाचा फड रंगला असल्याचे दिसून येत आहे. यंदा पुण्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणार आहे. यादरम्यान शरद पवार अध्यक्ष असलेली पण बरखास्त केलेली जुनी कुस्तीगीर परिषद आणि भाजप खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त झालेली नवीन कुस्तीगीर परिषद या दोन्ही गटांनी स्पर्धा भरवणार असल्यामुळे वाद निर्माण झाला आहे.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या आयोजनावरून आता हा नवीन वाद सुरू झाला आहे. भारतीय कुस्ती महासंघ आणि राज्यातील संघटना महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे माजी पदाधिकारी यांच्यामध्येच हा वादाचा आखाडा रंगल्याचे पाहायला मिळाले.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेची कार्यकारिणी भारतीय कुस्ती महासंघाने बरखास्त केली आहे. त्यानंतर भारतीय कुस्ती महासंघाकडून राज्यासाठी एका अस्थायी समितीची स्थापना करण्यात आली. यंदाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी पुणे राष्ट्रीय तालीम संघाकडे देण्याबाबत निर्णय या समितीने घेतला आहे. पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकारातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा भरवण्याचा अधिकार आपल्यालाच असल्याचा दावा कुस्तीगीर परिषदेचे माजी सचिव बाळासाहेब लांडगे यांनी केला आहे. बाळासाहेब लांडगे महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे सचिव नसून सुध्दा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं ते आयोजन करतायेत अशी माहिती मिळत आहे. मात्र त्यांनी भरवलेल्या स्पर्धेत कुस्ती पटुंनी सहभागी होऊ नये अशा आशयाचं पत्रक भारतीय कुस्ती महासंघानं काढलं आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Apps Ban India : भारताने 'या' 5 OTT प्लॅटफॉर्मवर घातली बंदी! तुमच्या मोबाईलमध्ये असेल तर लगेच करा डिलीट, नाहीतर होईल कारवाई

Ranji Trophy Final मध्ये मोठा राडा! जम्मू-काश्मीरचा कर्णधार कर्नाटकच्या फिल्डरला भिडला, मग मयंक अगरवालही...

३० हजारांची लाच घेतली अन् फसला, उपसंचालकाकडे ४ कोटींची रोकड, कोट्यवधींचं सोन् आणि अनेक ठिकाणी फ्लॅट; ट्रॉली बॅगेत पैसे

Sensitive Teeth Tips: दात संवेदनशील आहेत? गरम किंवा थंड खाल्ल्यावर झिणझिण्या येतात? हे 3 टिप्स आजच फॉलो करा

Mumbai News: मुंबईतील राणीच्या बागेत गुजरातच्या सिंहाची गर्जना होणार; कधी? महत्त्वाची माहिती समोर

SCROLL FOR NEXT