Maharashtra Kesari Controversy sakal
क्रीडा

Maharashtra Kesari Controversy : "मी कोणाच्या बापाला घाबत नाही..." ; 'त्या' ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय?

सकाळ डिजिटल टीम

Maharashtra Kesari Sikandar Shaikh Controversy: यंदाचा महाराष्ट्र केसरी किताब पैलवाल शिवराज राक्षेने पटकावला आहे. मात्र स्पर्धेत सर्वात चर्चेत राहिला तो पैलवान सिकंदर शेख होता. महेंद्र गायकवाडने उपांत्य फेरीत सिकंदर शेखचा पराभव केला.

महाराष्ट्र केसरीत सिकंदर शेख विरोधात चार गुण दिल्याने पंच मारूती सातव यांना धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिस दलातील शिपाई संग्राम कांबळे यांनी फोन वरून कुस्ती स्पर्धेत पंच यांना धमकी दिली. फोन रेकॉर्डिग देखील समोर आली आहे. संग्राम कांबळे यांनी सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांचा कुस्तीतील पंच मारुती सातव यांना फोन करून लाज काढली.(maharashtra kesari Controversy 2023 Panch Maruti Satav audio secunder sheikh vs Mahendra Gaikwad)

धमकी नंतर पंच मारूती सातव याने महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या समिती अध्यक्षांकडे तक्रार अर्ज केला. या तक्रारीचा अर्ज संपूर्ण प्रकरणी संदीप भोंडवे, महाराष्ट्र केसरी स्पर्धा समिती कडून कोथरूड पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

ऑडिओ मध्ये नेमके काय घडले ?

सिकंदरच्या कुस्तीला तुम्हीच पंच होता ना? मारुती सातव हो हो… त्यानंतर संग्राम कांबळे म्हणाले की, तुमच्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घ्या की तुन्ही दिलेला निर्णय बरोबर होता. त्यानंतर मारुती सातव म्हणाले की, कांबळे पैलवान, ऐका!

त्यानंतर संग्राम कांबळे संतापून म्हणाले की, तुम्ही आमचं ऐका तुमचं काल आम्ही ऐकलं आणि बघितलं पण आहे. तुम्हा काय निर्णय दिला तो. तुम्ही निर्णय दिला तो चुकीचा आहे. तुम्ही दबावाला बळी पडून निर्णय घेतला आहे.

मारुती सातव म्हणाले की, 20 वर्षांपासून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धात पंच म्हणून काम करत आहे. खालची टांग हा डाव महेंद्रने सिकंदरवर लावला होता आणि सिकंदरसुद्धा डेंजर झोनमध्ये गेला होता. मी कोणाच्या बापाला घाबत नाही, जा काय करायचे ते कर. कारण मला वाटत नाही की मी कुणावर अन्याय केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावतीत पुन्हा बिबट्याची दहशत, पीडीएमसी परिसरात दिसल्या पाऊलखुणा, वनविभागाकडून शोधमोहीम

राजुरा हत्याकांड प्रकरण पोलिसांसाठी लाजिरवाणी बाब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत कबुली, नेमकं काय म्हणाले?

Latest Marathi News Update : कुख्यात गुंड मंगेश मडावी पोलिसांच्या जाळ्यात,सुजातपूरमधून अटक, ‘मोक्का’अंतर्गत कारवाई

Agriculture Loss By Rain : अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; मुळशी तहसीलदार विजयकुमार चोबे यांचे आदेश

Pune News : निधी येऊनही शहरात पाणी का साठते? केंद्रीय राज्यमंत्री मोहोळांकडून प्रशासनाची झाडाझडती

SCROLL FOR NEXT