Maharashtra Kesari Esakal
क्रीडा

Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरीचा उत्साह शिगेला! जगताप-सरनौबतमध्ये ८६ किलोच्या विजेतेपदासाठी लढत

जगताप-सरनौबतमध्ये ८६ किलोच्या विजेतेपदासाठी लढत

सकाळ डिजिटल टीम

पुणे जिल्ह्याच्या प्रतीक जगताप व उस्मानाबादच्या मुंतजिर सरनौबत यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी मल्लांना पराभूत करताना ६५ व्या वरिष्ठ गट गादी व माती राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेच्या ८६ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. या दोघांमध्ये उद्या अंतिम लढत होणार आहे. कोथरूड येथील स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत या स्पर्धेचे आयोजन भाजपचे राज्य संघटक व पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये प्रतीक जगतापने सोलापूरच्या एकनाथ बेंद्रेला ८-३ असे पराभूत करताना अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये उस्मानाबादच्या मुंतजिर सरनौबतने सातारा जिल्ह्याच्या विजय डोईफोडेला ५-१ असे करताना अंतिम फेरी गाठली.

हे ही वाचा : गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून

उपांत्यपूर्व फेरीत साताऱ्याच्या विजय डोईफोडेने पुणे शहरच्या ओंकार दगडेवर १३-२ अशी मात केली. पुणे जिल्ह्याच्या प्रतीक जगतापने कल्याणच्या सोमनाथ भोईरवर ७-० अशी मात केली. मुंतजिर सरनौबतने ठाण्याच्या विशाल महातेकरला मात देताना उपांत्य फेरीत प्रवेश केला. सोलापूरच्या एकनाथ बेंद्रेने कोल्हापूर जिल्ह्याच्या किरण पाटीलला ११-० असे पराभूत केले.

तत्पूर्वी, स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात झालेल्या ८६ किलो वजनी गटात नांदेडच्या विजय पवारने उस्मानाबादच्या हर्षवर्धन लोटकेला थेट चितपट करताना स्पर्धेच्या पुढील फेरीत प्रवेश केला. याच गटात सोलापूर जिल्ह्याच्या राहुल काळेने संभाजीनगरच्या (औरंगाबाद) मोईन शेखला चितपट केले. भंडारा जिल्ह्याच्या अर्जुन काळेने मुंबई शहरच्या दिनेश पवारला १०-३, मुंबई पश्चिमच्या रोहित मोढळेने पुणे जिल्ह्याच्या संतोष पडळकरवर १५-५ अशी मात करताना पुढील फेरी गाठली. नाशिक जिल्ह्याच्या नितीन बेझेकरने रायगडच्या सचिन भोपीला ७-४ असे गुणांच्या साह्याने पराभूत केले. वाशीमच्या सचिन पाटीलने बीडच्या अनिकेत गोरेवार ४-१ अशी मात करताना स्पर्धेच्या पुढच्या फेरीत धडक दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Hailstorms: पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात गारपीट! वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; 'या' भागांना अलर्ट

Mutha Canal Overflow : मांजरी परिसरात मुठा कालवा ओव्हर फ्लो झाल्याने रस्त्यावर व झोपड्यांमध्ये शिरले पाणी, वाहतूक कोंडीत अडकले प्रवासी

शेतकऱ्यांना उजनीचे सलग ८० दिवस पाणी! धरणाचे ९ दरवाजे उघडले; उन्हाळी आवर्तनासाठी लागणार १७ टीएमसी, धरण ५७ टक्के भरलेले, वाचा...

Bidkin News : बिडकीन हादरले! विहिरीत बुडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मित्रांसमोरच घडली दुर्दैवी घटना

Pune Crime : गुंतवणूकदारांची फसवणूक; भाजपचा नेता शेखर चरेगावकरला अटक

SCROLL FOR NEXT