Maharashtra Kesari Kusti 2023 pune
Maharashtra Kesari Kusti 2023 pune sakal
क्रीडा

Maharashtra Kesari : गतविजेत्या पृथ्वीराजला पराभवाचा धक्का! पुण्याच्या हर्षद कोकाटेचा सनसनाटी विजय

युवराज पाटील-सकाळ वृत्तसेवा

Maharashtra Kesari Kusti 2023 : महाराष्ट्र केसरी विजेता कोल्हापूरचा मल्ल पृथ्वीराज पाटीलला यंदाच्या स्पर्धेत पराभवाचा धक्का बसला. पुण्याच्या हर्षद कोकाटेने चुरशीच्या लढतीत पृथ्वीराजचा ९-३ असा पराभव केला.

सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या या लढतीत हर्षद कोकाटेने भक्कम अशी आघाडी घेतली. उत्तरादाखल पृथ्वीराज पाटीलने ही आक्रमक खेळी करत मध्यंतरापूर्वी तीन गुणांची कमाई केली. दोन्ही कुस्तीगिरांना त्यांचे पाठीराखे जोरदार समर्थन देत होते.

पहिल्या राऊंडमध्ये हर्षदने ४-३ अशी आघाडी घेतली. दुसऱ्या राऊंडमध्ये पृथ्वीराज पाटीलने आक्रमक खेळ करण्यास सुरुवात केली. हर्षद कोकाटेने तीन गुणांनी आघाडी घेतली. पृथ्वीराज पाटीलने पुन्हा पुन्हा आक्रमण करण्याचा प्रयत्न केला; मात्र हर्षद कोकाटेने प्रत्येक आक्रमण थोपवून लावत पृथ्वीराजला पुनरागमन करण्याची संधी दिली नाही.

पूर्व महाराष्ट्र केसरी आणि नाशिकचा हर्षवर्धन सदगीर-बुलडाण्याच्या समीर शेख यांच्यात तुल्यबळ लढत झाली. सदगीरने आपली गुणवत्ता आणि लय कायम ठेवत समीर शेखचा ३-० ने पराभव केला. अखेरच्या क्षणी समीरने हर्षवर्धनवर दुहेरी पट टाकण्याचा प्रयत्न केला; मात्र सदगीरने बचाव करत विजय मिळवून चौथ्या फेरीत प्रवेश केला.(Harshad Kokate victory Defeat to defending champion pruthviraj patil)

सातारच्या किरण भगत याने गोंदियाच्या महारुद्र काळे याचा ५-४ असा पराभव केला. सुरुवातीला महारुद्र काळे याने ४-२ अशी आघाडी घेतली होती, तेव्हा मातीवरच्या कुस्तीत माऊली जमदाडे याच्यानंतर पुन्हा एकदा धक्कादायक निकाल नोंदवला जातो का असे वाटत असतानाच किरणने अनुभव पणास लावून सामना ५-४ असा जिंकला. बीडच्या अक्षय शिंदे आणि मुंबईच्या अनिकेत मंगडे यांच्यातही जोरदार लढत झाली. अक्षयने उत्तम खेळ करत अनिकेतला पराभूत केले. पुण्याच्या तुषार दुबे आणि तुषार वरखंडे यांच्यामध्ये झालेल्या लढतीत दुबेने विजय मिळवला.

माती विभागात सोलापूरच्या महेंद्र गायकवाडने नांदेडच्या अनिल जाधवला ५-० अशा फरकाने पराभूत केले. २०१९ चा उपमहाराष्ट्र केसरी व लातूरचा मल्ल शैलेश शेळके याने परभणीच्या राकेश देशमुखला धूळ चारली.

किरण भगत चितपट

पुढच्या फेरीत सातारचा किरण भगत याला बुलढाण्याच्या बाला रफिक शेख याने १५ सेकंदामध्ये चितपट केले. बाला रफिक शेख याने दुहेरी पट मारत किरणला पराभूत केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT