Maharashtra Kesari Sakal
क्रीडा

मार मुंसडी! महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं वेळापत्रक ठरलं

कोरोनाच्या संकटामुळे मागील दोन वर्षे ही स्पर्धा झाली नव्हती.

सकाळ डिजिटल टीम

पुणे : राज्यातील मानाची आणि लोकप्रिय महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा साताऱ्यात पार पडणार आहे. 64 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती (Maharashtra Kesari) स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले झाले आहे. 5 एप्रिल ते 9 एप्रिल दरम्यान कुस्तीचा आखाडा रंगणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुस्तीगीर परिषदेनं विशेष नियमावलीही जाहीर केली आहे. 5 तारखेला मोठ्या थाटामाटात या स्पर्धेचं उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. कोरोनाच्या संकटामुळे मागील दोन वर्षे ही स्पर्धा झाली नव्हती. त्यामुळे यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेकडे सर्वांच्या नजरा लागून होत्या.

महाराष्ट्र केसरीसाठीच्या सर्व लढती सातारा (satara) शहरातील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकूलात खेळवण्यात येणार आहेत. ऑलिंपिक स्पर्धेत देशाला पहिले कास्य पदक मिळवून देणा-या ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांच्या भूमीत मानाची गदा उंचवण्यासाठी चांगलीच चूरस पाहायला मिळाले. यात बाजी कोण मारणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

कै.मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्रात राज्य कुस्तीगीर परिषदेची कार्यकारणी सभा 10 तारखेला पार पडली. या बैठकीतच 64 वी वरिष्ठ गट गादी आणि माती राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसह महाराष्ट्र केसरी 'किताब लढत' 5 ते 9 एप्रिलपर्यंत साता-यातील श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात घेण्याचे निश्चित करण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 5 दिवसांतच 1 लाखाचे झाले 3 लाख! 300% रिटर्न देणाऱ्या शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल

Ganeshotsav 2026: हरतालिका अन् गणेश चतुर्थी एकाच दिवशी का? पूजा करण्याची योग्य वेळ कोणती? | Ganesh Chaturthi 2026

Nagpur Crime: शेअर मार्केटमध्ये पैसे बुडाले; कर्ज फेडण्यासाठी उच्चशिक्षित तरुणाने चक्क SBI बँक लुटली, ४.५३ लाखांसह पोलिसांच्या ताब्यात

Latest Marathi News Live Update : राज्यात दुष्काळजन्य स्थिती, राज्यात ऑगस्ट महिन्यात ४६ टक्के तूट

Maratha Reservation: मनाेज जरांगे-पाटलांच्या उपोषणाला जुन्नरमधून पाठिंबा; आळेफाट्यावर मराठा समाजाचा रास्ता रोको, मुंबईकडे कूच करण्याचा इशारा

SCROLL FOR NEXT