Sonam Uttam Maskar esakal
क्रीडा

ISSF World Cup final : कोल्हापूरची नेमबाज सोनम मस्कर हिने वर्ल्ड कपमध्ये जिंकले रौप्यपदक

Sonam Maskar Silver medal : आजपासून सुरू झालेल्या नेमबाजी वर्ल्ड कप स्पर्धेत भारताच्या पदकाचे खाते महाराष्ट्राच्या लेकीने उघडून दिले.

Swadesh Ghanekar

नवी दिल्ली: नेमबाजी सोनम उत्तम मस्कर हिने आजपासून सुरू झालेल्या ISSF World Cup Final 2024 स्पर्धेत भारताला १० मीटर एअर रायफलमध्ये रौप्यपदक जिंकून दिले. २२ वर्षीय सोनमने अंतिम फेरीत २५२.९ गुणांची कमाई करून रौप्यपदक नावावर केले. चीनच्या युटींग हुआंगने सुवर्णपदक जिंकले, तर फ्रान्सच्या ओसिने मुलरला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. सोनम मुळची पुष्पनगर, गारगोटीची रहिवासी आहे. मागील तीन वर्षांपासून वेध रायफलच्या आंतरराष्ट्रीय नेमबाज व प्रशिक्षक राधिका हवालदार-बराले आणि रोहीत हवालदार हे तिला मार्गदर्शन करीत आहे.

पहिल्या दिवशी १० मीटर एअर पिस्तूल पुरुष आणि महिलांच्या फायनलही झाली. या वर्ल्ड कप स्पर्धेत ३७ देशांतील जगातील १३१ अव्वल नेमबाजांनी सहभाग घेतला आहे. यामध्ये अनेक ऑलिम्पिक चॅम्पियन्सचा समावेश आहे. प्रत्येक १२ वैयक्तिक ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये वर्षातील सर्वोत्कृष्ट नेमबाज ठरवण्यासाठी ही हंगाम संपणारी स्पर्धा आहे. यामध्ये २३ भारतीय अव्वल नेमबाजांचाही समावेश असेल. सहा ISSF वर्ल्ड कप टप्प्यातील जगातील अव्वल सहा खेळाडू, तसेच पॅरिस ऑलिम्पिक पदक विजेता, गतविजेता ISSF वर्ल्ड कप अंतिम विजेता आणि गतविजेता हे नवी दिल्लीतील वर्ल्ड कप फायनल स्पर्धेतील प्रत्येक १२ प्रकारात थेट पात्र ठरले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक शिव्या देतात, स्वागताला आलेल्या कार्यकर्त्यांना अजितदादांनी झापलं; VIDEO VIRAL

Maharashtra Latest News Update: उजनी धरणातून विसर्ग वाढविला, भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Income Tax Return : कर सल्लागारांची तारेवरची कसरत; प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची तारीख वाढविल्याचा परिणाम

BCCI निवड समितीमधील 'या' सदस्याची उचलबांगडी करणार, अजित आगरकरचा करार...

UPSC Mains: युपीएससी मेन्समध्ये उत्तर लिहिताना 'या' 5 चुका करू नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT